नवी दिल्ली :
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील वादा संपण्याची चिन्ह दिसत नाही. खडसे यांनी गुरुवारी आरोप केल्यानंतर शुक्रवारी फडणवीसांनी देखील प्रत्युत्तर दिले. ‘मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही.मी संयमी आहे’असे फडणवीस यांनी म्हटले.
दिल्लीत पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी एकनाथ खडसे, मराठा आरक्षण, कंगना रनौत, महाराष्ट्रातील कोरोना स्थिती अशा विविध विषयावर भाष्य केले. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन आरोप केले होतेे. त्या आरोपांना आज देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिल आहे. ते म्हणाले, मी खडसे यांच्यावर काही बोलणार नाही. ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत. पण एक सांगेल एकनाथ खडसेंना मनीष भंगाळे प्रकरणात नव्हे तर MIDC जमीन खरेदीप्रकरणात मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
एमआयडीसीची तथाकथित जी जमीन त्यांच्या कुटुंबियांनी घेतली. मनीष भंगाळे प्रकरणात खडसेंना क्लिन चीट आहे. त्या प्रकरणात त्यांना कुठेही राजीनाम द्यावा लागला नाही. कुटुंबीयांसाठी जमीन घेतल्याचा आरोप झाला, जमीन घेत असताना खडसे पदावर होते, त्यावर आम्ही चौकशी समिती नियुक्त केली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला. तो गुन्हा मी दाखल केला नाही. विनाकारण लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे कारण नाही. आमच्या ज्येष्ठ नेत्यांच्या तक्रारी घरातल्या घरात मिटवू.
खडसेंची पुन्हा प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस म्हणतात त्यापेक्षा मी जास्त संयमी आहे. मी पाच वर्षापासून सहन करत आलो आहे. एमआयडीसीची जी जमीन घेतली, त्याच्या सातबाऱ्यावर २०१० नंतर इतर हक्कात एमआयडीसीचे नाव लावण्यात आले. ही कागदपत्रे पाहूनच माझी बायको आणि जावयाने ती जमीन खरेदी केली आहे. ती जमीन मी खरेदी केली नाही. त्यामुळे माझा काय दोषी. बायकोच्या किंवा जावयाचा व्यवहारावर मी कसा दोषी? असा सवाल खडसेंनी केला.
काय म्हणाले होते खडसे
आमचा मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का?, असा सवाल खडसे यांनी केला असून, लवकरच नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थानफ पुस्तक लिहिणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या पुस्तकात सबळ पुरावे मी देणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
सगळे म्हणतात नाथाभाऊ चांगले, मग तिकीट का दिले नाही? मुख्यमंत्री होऊ शकलो नाही याचं दुःख नाही. उत्तर महाराष्ट्राला कधीही मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, अशी खंत व्यक्त करत खडसे म्हणाले, आजपर्यंत मी पक्षाच्या विरोधात, नेत्याच्या विरोधात कधीही बोललो नाही. मला देवेंद्रजींकडून त्रास झाला म्हणून बोललो. पक्षाच्या विरोधात कधीही बोलणार नाही.