Tuesday, March 25, 2025
Homeराजकीय…याबद्दल काँग्रेसला माफी मागायला लावणार का?; नेहरूंचं नाव घेत फडणवीसांचा ठाकरेंना बोचरा...

…याबद्दल काँग्रेसला माफी मागायला लावणार का?; नेहरूंचं नाव घेत फडणवीसांचा ठाकरेंना बोचरा सवाल

मुंबई | Mumbai

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याविरोधात महाविकास आघाडीने रविवारी राज्यभरात ‘जोडे मारो’ आंदोलन केले. ठिकाठिकाणी राज्य सरकारच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

मुंबईत हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियादरम्यान मविआने मोर्चा काढला. यावेळी उद्धव ठाकरेंनी ‘शिवद्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया करण्याची वेळ आली आहे’ असा घणाघात केला. याच्या प्रत्युत्तरादाखल उपमुख्यमंमत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना घेरले आहे. काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांच्या केलेल्या अपमानाबद्दल फडणवीसांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

फडणवीस म्हणाले, माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की, नेहरुजींनी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिले आहे, त्या संदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का? काँग्रेसने मध्य प्रदेशात ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडेजर लावून तोडला, त्यावर शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे का मूग गिळून बसले आहेत? कर्नाटकात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाने ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हाटवला, त्या बद्दल एक शब्दही का बोलत नाहीत, सर्वप्रथम याचे उत्तर द्यायला हवे.

हे देखील वाचा : Maharashtra Weather Update : राज्यभरात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

एवढी वर्ष काँग्रेसने आम्हाला इतिहासात शिकवले की, शिवाजी महाराजांनी सूरत लुटली, महाराजांनी सुरत लुटली नव्हती, तर महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजीना हा योग्य त्या लोकांकडून घेतला होता किंवा त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं. पण सूरत कधी त्यांनी लुटली नव्हती. पण, जणू काही महाराज सामान्य माणसाची लुट करायला गेले होते, अशा प्रकारचा इतिहास आम्हाल एवढी वर्ष ज्या काँग्रेसने शिकवला, त्यांना माफी मागायला सांगणार आहात की, खुर्चीसाठी त्यांचे मिंधेपण स्वीकारणार आहात? हे सागितलं पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.

हे देखील वाचा : LPG Price Hike : महिन्याची सुरूवात महागाईने! गॅस सिलिंडर महागला… किती रुपयांनी वाढले दर?

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...