अकोला । वृत्तसंस्था Akola
आज उद्धव ठाकरे यांची मुंबईत सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना लक्ष्य केलं. यालाच प्रत्युत्तर देताना अकोला येथील सभेत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे.
देवेंद्र फडणवीस बोलतांना म्हणाले की, मी म्हणालो होतो मैं समंदर हूं लौटकर जरुर आऊंगा. परत तर आलोच शिंदेंना देखील परत घेऊन आलेलो आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना सांगितलं होतं, ज्या दिवशी काँग्रेससोबत जाण्याची वेळ येईल तेव्हा मी माझं दुकान बंद करील. परंतु आम्ही उद्धव ठाकरे यांच दुकान बंद केलं आणि बाळासाहेबांचा पक्ष जिवंत ठेवला.
जगामध्ये ५ देश कोविडची लस बनवू शकले, त्यामध्ये भारत हा एक देश आहे. मोदीजींनी लस दिल्यामुळे आज आपण जिवंत आहोत. पंतप्रधान मोदी यांनी १०० देशांना लस दिली.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मोदींना बॉस म्हणतात. १२० देशाचे प्रमुख म्हणतात जगात आमचा आवाज तुम्ही आहात. सगळ्या आखाती देशांनी एकत्रित येऊन त्यांच्या सर्वोच्च सन्मान त्यांनी पंतप्रधान मोदी यांना दिला. हा खऱ्या अर्थाने भारताचा सन्मान आहे.
देशभरातील विरोधक पाटण्याला एकत्र येणार आहेत, हातात हात घेणार आहेत आणि ‘मोदी हटाओ’च्या घोषणा देणार आहेत. आता त्यांच्यात एक नेता वाढला आहे. तो म्हणजे उद्धव ठाकरे. मात्र कितीही वेली एकत्र आल्या तरी त्या वटवृक्ष होऊ शकत नाही. वटवृक्ष एकच असतो त्याचं कुणीही वाकडं करु शकत नाही, असं फडणवीस म्हणाले .