Thursday, November 14, 2024
Homeराजकीयमी संजय राऊत यांना ‘ ही ’ अट घातली

मी संजय राऊत यांना ‘ ही ’ अट घातली

मुंबईः

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या बैठकीवर अखेर भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडत खुलासा केला. या राजकीय अर्थ काढला गेला होता.

- Advertisement -

होय, मी देवेंद्र फडणवीसांना भेटलो

देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात शनिवारी (२६ सप्टेंबर) मुंबईतील हयात हॉटेलमध्ये भेट झाली. या भेटीनंतर शिवसेना – भाजपमध्ये पुन्हा युती होणार का, अशा चर्चा रंगत होत्या. मात्र, रविवारी देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चा फेटाळून लावत. ते म्हणाले, हे सरकार त्यांच्या कृतीमुळेच कोसळेल. आम्हाला सरकार स्थापनेची घाई नाही. या भेटीत सत्तास्थापनेवर कोणतीही चर्चा झाली नाही. ही भेट अराजकीय होती.

संजय राऊत यांनी सामना दैनिकासाठी माझी मुलाखत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. याच मुलाखतीसंदर्भात आमची बैठक झाली. या मुलाखतीसंदर्भात मी त्यांनी काही अटी घातल्या होत्या. ही मुलाखत अनकटच असेल आणि माझाही कॅमेरा तिथे असेल, असे मी त्यांना सांगितले. त्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी आम्ही भेटलो.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या