Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्या'मी पुन्हा येईन'वरून फडणवीसांचे स्पष्टीकरण; म्हणाले, "पुन्हा यायचं असेल तर..."

‘मी पुन्हा येईन’वरून फडणवीसांचे स्पष्टीकरण; म्हणाले, “पुन्हा यायचं असेल तर…”

मुंबई | Mumbai

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. महाराष्ट्र भाजपच्या (BJP Maharashtra) अधिकृत X हँडलवरून व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. त्यामध्ये महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी पुन्हा येणार असल्याची पोस्ट होती. 2 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री आणि फडणवीसांनी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती आहे का? एकनाथ शिंदे (CM Eknat Shinde) समर्थक 16 आमदार निलंबित होणार म्हणून फडणवीस पुन्हा येणार का? असे सवाल आता उपस्थित झाले. पण दोन तासाच भाजप महाराष्ट्रच्या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ डिलिट करण्यात आला.

- Advertisement -

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप येणार अशा चर्चांना उधाण आलं. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी आहे. एकनाथ शिंदेंच्याच पाठिशी राहाणार, एकनाथ शिंदे हे आमचे मुख्यमंत्री आहेत, आणि त्यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्राचा विकास घडवण्यासाठी मी पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठिशी आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एखाद्याला यायचं असेल तर तो व्हिडिओ टाकून येतो का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील, एकही दिवस कमी नाही, पूर्ण कार्यकाळ आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रात निवडणुका होतील आणि आम्ही सर्व त्यांच्या पाठिशी खंबीरपणे आहोत, एकाद्या व्हिडिओमुळे असे समज करणं चुकीचे असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

काय आहे व्हिडिओत?

भाजप महाराष्ट्रच्या ट्विटर हँडलवर देवेंद्र फडणवीस यांचा फोटो वापरत त्यावर ‘महाराष्ट्राच्या निवनिर्मितीसाठी मी…’ असं वाक्य लिहिण्यात आलं आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ टाकण्यात आला आहे. या व्हिडिओत ‘मी पुन्हा येईन’ या देवेंद्र फडणवीसाच्या वाक्याचा संदर्भ देण्यात आला आहे. ‘शेवटी एवढंच सांगतो मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन याच निर्धाराने, याच भूमिकेत, याच ठिकाणी नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. मी पुन्हा येईन गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी…’

- Advertisment -

ताज्या बातम्या