Tuesday, November 26, 2024
Homeब्रेकिंग न्यूजविधानसभा जागावाटपासंदर्भात फडणवीस यांचे महत्वपुर्ण विधान; म्हणाले…

विधानसभा जागावाटपासंदर्भात फडणवीस यांचे महत्वपुर्ण विधान; म्हणाले…

नागपूर | Nagpur
राज्यातील लोकसभा निवडणुकांचे पाचही टप्पे संपले आहेत. आता देशातील लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा बाकी आहे. त्यातच आता पुढील काळात येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांच्या चर्चा सुरु झाल्या आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील विधानसभेच्या जागा वाटपावरुन विधान केले आहे. ते आज नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी भाष्य केले आहे.

यावेळी विधानसभेच्या जागावाटपावरुन देवेंद्र फडणवीस म्हणाले, विधानसभेमध्ये कोणी किती जागा लढायच्या या संदर्भात तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित बसतील, योग्य फॉर्म्युला ठरवतील, त्यानुसार तिन्ही पक्षांना जागा मिळतील. भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील. पण आमच्यासोबत जे दोन पक्ष आहेत, त्यांचा पूर्ण सन्मान हा यामध्ये राखला जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.

- Advertisement -

हे ही वाचा : “आपल्याला सत्तेत जावे लागणार…”; मनोज जरांगे पाटील यांचं सुचक विधान

संजय राऊत यांना टोला
संजय राऊत यांच्यावर टीका करताना फडणवीस म्हणाले, ‘संजय राऊत यांच्याबाबत मला विचारू नका, ते गांजा पिऊन लेख लिहितात, ते लंडनला आहेत, तिथे चांगले मानसोपचार तज्ज्ञ आहेत’. तर आगामी लोकसभा निकालावरही फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर दिले. ‘मोदींना बहुमत मिळाले आहे, तेच पंतप्रधान होतील, असे फडणवीस म्हणाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या