Friday, April 25, 2025
Homeमुख्य बातम्या...म्हणून मी शिवतीर्थावर गेलो; राज ठाकरेंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचे स्पष्टीकरण

…म्हणून मी शिवतीर्थावर गेलो; राज ठाकरेंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचे स्पष्टीकरण

मुंबई | Mumbai

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी रात्री उशीरा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवतीर्थावर भेट घेतली. काल रात्री अचानक उशीरा ही भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते….

- Advertisement -

गेल्या काही दिवसांत राज ठाकरे यांनी भाजपने घेतलेल्या काही भूमिकांवर टीका केली होती. त्यामुळे या दोघांमध्ये नेमकी कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होते याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

खासदार बाळू धानोरकर यांचे निधन; दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

मात्र “अराजकीय गप्पा मारण्यासाठी काल शिवतीर्थावर गेलो होतो,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की,’बऱ्याच दिवसांपासून आमचे ठरले होते, एक दिवस गप्पा मारायला बसु आणि त्याचा मुहूर्त काल लागला. आम्ही गप्पा मारल्या. या भेटीत राजकीय गोष्टी सोडुन गप्पा मारायच्या असेही फडणवीस यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.

‘स्वच्छ मुख अभियाना’च्या ब्रँड ॲम्बेसेडरपदी सचिन तेंडुलकरची नियुक्ती; म्हणाला, माझ्या बाबांनी…

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे वेगळी भुमिका घेताना दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसात राजकीय वर्तुळात आगामी मुंबई महानगरपलिकेची निवडणूक तसेच मनसे आणि भाजप-शिवसेना युती होणार असल्याच्या चर्चा होत्या. पण गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता, राज ठाकरेंनी भाजपच्या काही भूमिकांना विरोध दर्शवला आहे.

तसेच, नुकत्याच झालेल्या कर्नाटक निवडणुकीतील पराभवानंतर राज ठाकरे यांनी भाजपवरही टीका केली होती. ज्यांना वाटतं कोणीही आपला पराभव करु शकत नाही, त्यांनी या निकालातून धडा घ्यावा, असे राज ठाकरे म्हणाले होते. आता दोन्ही नेत्यांच्या भेटीवरुन अनेक अर्थ काढले जात असून, या पार्श्वभूमीवर फडणवीस राज ठाकरे यांच्यातील भेटीला महत्त्व आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ajit Pawar : “मी पहाटे ४ वाजता उठतो, फिरतो, व्यायाम करतो...

0
पुणे(प्रतिनिधी) आमचे सरकार २४ तास जनतेच्या सेवेत असल्याचे सांगितलं. मी पहाटे ४ वाजता उठतो, फिरतो, व्यायाम करतो आणि कामाला सुरुवात करतो. साधारण १० ते ११...