Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis: सुरेश भटांची कविता…जयंत पाटलांवर टिप्पणी; देवेंद्र फडणवीसांची सभागृहात चौफेर टोलेबाजी

Devendra Fadnavis: सुरेश भटांची कविता…जयंत पाटलांवर टिप्पणी; देवेंद्र फडणवीसांची सभागृहात चौफेर टोलेबाजी

मुंबई | Mumbai
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत चालू असून त्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये कधी कलगीतुरा, कधी खडाजंगी तर कधी सहमती पाहायला मिळत आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यामुळे सुरुवात वादळी झाली. आज त्याच राजीनाम्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला न सांगता माध्यमांना सांगितले यावरून विरोधकांनी सरकारला घेरले. परकीय गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या टीकेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास त्यांच्या शैलीत टीका केली आहे.

जयंत पाटील चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहतात आणि चुकीच्या गोष्टी सांगतात असा मिश्किल टोला फडणवीसांनी लगावलाय. तसेच योग्य गोष्टी, योग्य लोकांसोबत योग्यवेळी सांगितल्या तर त्या कार्यान्वित होतात असा सूचक सल्लाही त्यांनी यावेळी जयंत पाटलांना दिलाय.

- Advertisement -

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीसांनी यावेळी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या अवस्थेवर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांच्यावर खोचक टिप्पणी केली. “आपण शेतकऱ्यांकडून मागच्या काळात वीजबिल वसूल न केल्यामुळे आपल्या सरकारी कंपनीवर ७५ हजार कोटींचे कर्ज आहे. पण ते हळूहळू आपण व्यवस्थित करू. आपला प्रयत्न असा आहे की सरकारने थोडा पाठिंबा दिला तर देशात आपली पहिली वीज कंपनी असेल जी आपण स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंग करू आणि तिथून आपण पैसे उभे करू. हा आपला प्रयत्न आहे. त्या दिशेने आपले काम चालू आहे”, असे फडणवीस म्हणाले.

यासाठी कंपनीचे व्हॅल्युएशन चालू असल्याचे फडणवीसांनी सांगताच समोर बसलेल्या जयंत पाटील यांनी “त्या वेळी तुमच्या मनात होते, पण झाले नाही. २००३ सालीही त्याचे व्हॅल्युएशन झाले होते”, असे सांगितले. तेव्हा सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा संदर्भ देत यावर देवेंद्र फडणवीसांनी जयंत पाटलांना टोला लगावला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, जयंतराव तुमचा प्रॉब्लेमच तो आहे की तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी सांगता. योग्य गोष्टी योग्य लोकांसोबत योग्य वेळी सांगितल्या तर त्या कार्यान्वित होतात’, असा देवेंद्र फडणवांनी जयंत पाटील यांना टोला लगावला. यावर बाजूला बसलेल्या अजित पवारांनी लागलीच ‘माझ्यासारखे करत नाहीत ते’, असे म्हणताच सभागृहात मोठा हशा पिकला. त्यावर फडणवीसांनीही लागलीच ‘तुम्ही दादांचे ऐकत नाहीत आणि माझेही ऐकत नाहीत हा तुमचा प्रॉब्लेम आहे’.

दरम्यान, यावेळी फडणवीसांनी जयंत पाटलांना महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून टोला लगावला. “जयंतरावंसारख्या नेत्यांनी तरी राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर शंका उपस्थित करू नये. रोहित दादा वगैरे ठीक आहेत. त्यांनी शंका उपस्थित केली तरी चालू शकते. ते अनभिज्ञ आहेत असे नाही. पण ते तुलनेने तरुण आहेत. त्यामुळे तरुण माणसाने केले किंवा वरुणने केले (वरूण सरदेसाई) तर चालू शकते. पण तुम्ही तरी तसे करू नये”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी फडणवीसांनी सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट यांची एक गझल ऐकवताच सत्ताधारी व विरोधी बाकांवरील सदस्यांनी त्यावर दाद दिली.

सुरेश भटांची कविता
साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे
असतात शंकेखोर जे, त्यांचे कधी झाले बरे?”

ही सुरेश भट यांची गझल फडणवीसांनी ऐकवली.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले,१५ लाख कोटींचे सामंजस्य करार दावोसमध्ये केले आहे. त्यातील ४५ प्रकल्पात सिरियस प्रोग्रेस झाली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात करार केले देशात झालेल्या पाच लाख कोटींचे सामंजस्य करार दावोसमध्ये केले आहे. त्यातील ४५ प्रकल्पात सिरीअस प्रोग्रेस झाली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात करार केले देशात झालेल्या कराराचे गुंतवणूकीत रुपांतर होण्याचा दर ३५ ते ४५ टक्के आहे. आपल्याकडे हाच दर ८० ते ९१ टक्के आहे. एक इंडस्ट्रीज करार केल्यानंतर संपूर्ण प्रकल्प सुरु करायला पाच ते सात वर्षे लागतात.आपण मॅग्नेटिक महाराष्ट्रात केलेल्या करारातील ८० टक्के करार हे प्रॉडक्शन लेव्हलला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...