Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis: RSS बंदी असलेली संघटना आहे का? फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरच्या टीकेला...

Devendra Fadnavis: RSS बंदी असलेली संघटना आहे का? फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरच्या टीकेला प्रत्युत्तर

मुंबई | Mumbai
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी व राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’शी संबंधित राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीला हजेरी लावल्याने वाद निर्माण झाला आहे. यानंतर राजकीय वर्तुळातील विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होत आहे. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार व अभिनेत्री कंगणा रानौत यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी संघाची महिला शाखा असलेल्या राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी हजेरी लावली होती. भगवा ध्वज, डॉ. हेडगेवार, गोळवलकर आणि भारतमातेच्या तसबिरी असलेल्या या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतानाचा फोटो समोर आला होता. यावर खासदार सुनेत्रा पवार यांनी स्पष्टीकरणही दिले होते. पत्रकारांशी संवाद साधत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

- Advertisement -

मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बंदी असलेली संघटना आहे का असा प्रश्न उपस्थित करत विरोधकांना उत्तर दिले. “आरएसएस काय बॅन्ड आर्गनायजेशन (बंदी असलेली संघटना) आहे? मी स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे आणि मला स्वयंसेवक असण्याचा अभिमान आहे. मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमी राष्ट्रवाद शिकवला आहे. मला नेहमी समाजातील प्रत्येक व्यक्तीलाबरोबर घेऊन आपल्याला देशाचे कल्याण करायचे आहे हेच शिकवले आहे. त्यामुळे समजा जर कोणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एखाद्या कार्यक्रमात गेले तर त्याच्यासाठी एवढे आकांडतांडव करण्याची काय गरज आहे?” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

YouTube video player

सुनेत्रा पवार काय म्हणाल्या होत्या?
दरम्यान, टीका होत असताना सुनेत्रा पवार यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी एक्सवर यासंबंधी एक पोस्ट केली आहे. एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे, ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की, त्यामागे कोणताही राजकीय उद्देश नव्हता. यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या. राज्यसभेची खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना, मला विविध महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता असते. त्या बैठकीत विविध राज्यांतील महिला सहभागी होत्या. त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेले होते. त्या वेळी मला बोलण्यास सांगितले, तर मी फक्त दोन शब्दांत माझी भूमिका मांडली, असे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत भाविकांची लूट करणार्‍या एजंटांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांची (Devotee) अडवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या एजंटांच्या (Agent) मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. भाविकांची...