Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यादेवेंद्र फडणवीसांची चौकशी : राज्यभरात भाजपचं आंदोलन, नोटिसीची होळी

देवेंद्र फडणवीसांची चौकशी : राज्यभरात भाजपचं आंदोलन, नोटिसीची होळी

मुंबई | Mumbai

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फोन टॅपिंग प्रकरणात (Phone tapping case) बीकेसीतील सायबर पोलिस (Cyber ​​Police) ठाण्यात जबाब नोंदविण्याबाबत नोटीस पाठविण्यात आली. दरम्यान, फडणवीसांना देण्यात आलेली नोटीस आणि चौकशीचा राज्यभर भाजपकडून (BJP) निषेध केला जात आहे.

- Advertisement -

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांकडून या नोटीसची होळी केली जाणार आहे. काहीवेळापूर्वीच पुणे महानगरपालिकेबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात केली आहे. तर औरंगाबादमध्ये भाजप नेते अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या