Thursday, May 15, 2025
Homeमुख्य बातम्याDevendra Fadnavis: "पावसात भिजले की मतं मिळतात…"; फडणवीसांची भर पावसात राजकीय टोलेबाजी

Devendra Fadnavis: “पावसात भिजले की मतं मिळतात…”; फडणवीसांची भर पावसात राजकीय टोलेबाजी

शिराळा | Shirala
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. राजकिय नेत्यांच्या सर्वत्र जोरदार सभा, प्रचार रॅली सुरू आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भर पावसात सभा घेतली होती, त्यामुळे संपूर्ण निवडणूक फिरली होती. आता यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर पावसात सभा घेतली आहे. पावसात भिजले की मते मिळतात असे म्हणत टोलेबाजीही केली.

- Advertisement -

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
शुक्रवारी बत्तीस शिराळा इथे महायुतीचे उमेदवार सत्यजीत देशमुख यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत अचानक पावसाने हजेरी लावली. पाऊस सुरु असतानादेखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले भाषण सुरु ठेवले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून राजकीय टोलेबाजीही केली. “या ठिकाणी उपस्थित माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, तुम्हाला सांगतो..आता सत्यजीत दादा तुमची सीट निवडून येणे पक्क आहे. का बरे पक्क आहे? अरे मी पावसात सभा घोतोय ना? पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच. हे शुभ संकेत आहे,” असे फडणवीस म्हणाले.

ते पुढे म्हणतात, “काही नेत्यांचे म्हणणे आहे की, पावसात सभा झाली की निवडून येते. पण मी तुम्हाला सांगतो की, पाऊस पडो किंवा न पडो. पण मतांचा पाऊस पडणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. सत्यजीत देशमुखांच्या रुपात आपल्याला सुसंस्कृत नेता आणि जमीनीवर काम करणारा नेता मिळाला आहे. वाकुर्डी बुद्रुकची योजना युती सरकारणे आणली होती. पण त्यानंतर १९९९ ते २०१४ पर्यंत योजना बंद पडली. त्याकाळी जयंत पाटील पालकमंत्री, अर्थमंत्री आणि जलसंपदा मंत्री होते, पण त्यांनी या प्रकल्पासाठी फुटकी कवडी दिली नाही. मी मुख्यमंत्री झालो आणि एका झटक्यात १०० कोटी रुपये या योजनेसाठी दिले,” अशी टीकाही फडणवीसांनी यावेळी केली.

दरम्यान, त्याआधी कराडमध्येही फडणवीस यांची सभा होती. कराडला भाजपचे उमेदवार डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रचार सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता. त्यांच्या भाषणावेळी जोरदार पावसाने सुरुवात केली. सभेला पाऊस म्हणजे शुभसंकेत आहे. पाऊस आल्याने अतुल बाबाचा २३ तारखेचा मार्ग मोकळा झाला आहे, असं यावेळी फडणवीस म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वादळी पावसात पत्र्याचे शेड कोसळले; एक जण जखमी

0
  येवला| प्रतिनिधी Yeola शहर व परिसरात आजही, गुरुवारी (दि. १५) दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्याने शहरातील गंगा दरवाजा भागात पत्र्याचे शेड...