Wednesday, July 24, 2024
Homeमुख्य बातम्याDevendra Fadnavis : अजित पवारांना लबाड लांडग्याचं पिल्लू म्हणणाऱ्या पडळकरांच्या वक्तव्यावर फडणवीसांचे...

Devendra Fadnavis : अजित पवारांना लबाड लांडग्याचं पिल्लू म्हणणाऱ्या पडळकरांच्या वक्तव्यावर फडणवीसांचे स्पष्टीकरण, म्हणाले…

मुंबई | Mumbai

- Advertisement -

काल भाजप आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी माध्यमांशी बोलतांना धनगर समाजाबद्दल अजित पवार (Ajit Pawar) यांची भावना स्वच्छ नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत.अजित पवारांना आम्ही मानत नाही, असे विधान केले होते. पडळकरांच्या या टीकेवरून राज्यभरात अजित पवार गट आक्रमक झाला असून ठिकठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला ‘जोडो मारो’ आंदोलन करण्यात येत आहे. अशातच आता पडळकर यांच्या विधानावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे…

PM Narendra Modi Speech : जुन्या संसदेचं नवं नामकरण! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुचवलं ‘हे’ नाव

यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य अयोग्य आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करणे चुकीचे आहे. तिन्ही पक्षातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी तिन्ही पक्षातील नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे आणि अशा प्रकारच्या भाषेचा उपयोग करू नये असं माझं स्पष्ट मत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Maharashtra Rain Update : गणरायाच्या आगमनावेळी वरुणराजा लावणार हजेरी; ‘या’ जिल्ह्यांमध्ये धो-धो बरसणार

दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्यावरही टीका केली होती. ते म्हणाले होते की, “धनगर समाजाने (Dhangar Society) तुमच्या पालख्या वागवल्या. लोकांच्या चपला फाटल्या, तरी तुमच्या वडिलांनी, भावाने, पुतण्याने किंवा तुम्ही धनगर समाजाकडे पाहिले नाही. त्यामुळे धनगर समाजाबद्दल जास्त पुळका आणण्याची गरज नाही. आमचे लोक हुशार झाले आहेत,” अशा शब्दांत पडळकरांनी सुळेंवर निशाणा साधला होता.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Women Reservation Bill : लोकसभेत महिला आरक्षण विधेयक सादर

- Advertisment -

ताज्या बातम्या