Saturday, September 14, 2024
Homeमुख्य बातम्याDevendra Fadnavis : "या भेटीबाबत मला..."; शरद पवार-अजित पवारांच्या गुप्त भेटीवर फडणवीस...

Devendra Fadnavis : “या भेटीबाबत मला…”; शरद पवार-अजित पवारांच्या गुप्त भेटीवर फडणवीस स्पष्टच बोलले

मुंबई | Mumbai

- Advertisement -

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची पुण्यातील (Pune) कोरेगाव पार्कमध्ये (Koregaon Park) चोरडिया या बड्या उद्योगपतींच्या निवासस्थानी गुप्त भेट घेतली होती. यावेळी शरद पवारांसोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे देखील उपस्थित होते…

प्रसिद्ध उद्योगपती चोरडिया यांच्या बंगल्यावर शरद पवार उपस्थित असताना अजित पवारही या बंगल्यावर जातानाचे दृष्य अनेक वृत्तवाहिन्यांच्या कॅमेरामध्ये कैद झाले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

Rain Update : राज्यात मुसळधार पाऊस कधी बरसणार? हवामान विभागाने दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, “अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीबाबत मला काहीही माहिती नाही, त्याबाबतचा कोणताही तपशील माझ्याकडे नाही. भेट झाली, नाही झाली, किती वेळ झाली यासंदर्भातील कोणतीही माहिती माझ्याकडे नसल्याने मी तुमच्या ज्ञानामध्ये कोणतीही भर टाकू शकत नाही, मी त्याला सक्षम नाही”, असे फडणवीस यांनी म्हटले.

तसेच माध्यम प्रतिनिधींनी फडणवीस यांना मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) उद्या होणार असल्याची चर्चा आहे, असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देतांना फडणवीस म्हणाले की, “मला याबाबत काहीही माहित नाही. जर उद्या असेल तर नक्की कळवतो,” असे म्हटले.

Eiffel Tower : प्रसिद्ध ‘आयफेल टॉवर’ बॉम्बने उडवण्याची धमकी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादीत (NCP) बंडखोरी करत भाजपसोबत (BJP) सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात दोन गट निर्माण झाले आहे. अशातच काल शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पुण्यात गुप्त भेट झाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

शरद पवार-देवेंद्र फडणवीस आज एकाच मंचावर; दोघे काय बोलणार? अवघ्या राज्याचे लक्ष

- Advertisment -

ताज्या बातम्या