मुंबई | Mumbai
केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर २०२४ अखेरचा अहवाल जाहीर केला असून त्यात गेल्या १० वर्षातील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक अवघ्या ९ महिन्यात महाराष्ट्रात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.
सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षातील पहिल्या ९ महिन्यात आतापर्यंत एकूण १,३९,४३४ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक राज्यात आली आहे. ही गेल्या १० वर्षांत महाराष्ट्रात कोणत्याही एका वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत दिली आहे.
तसेच या आर्थिक वर्षातील तिमाही आणखी बाकी आहे. सर्वाधिक परकीय गुंतवणुकीबाबत संपूर्ण महाराष्ट्राचे मी अभिनंदन करतो. माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्वात आपल्या महाराष्ट्राची घौडदौड अशीच कायम राहील असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर २०२४ अखेरचा अहवाल जाहीर केला असून, गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक ही अवघ्या ९ महिन्यात महाराष्ट्राने प्राप्त केली आहे.…