Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis: स्थगिती देण्यासाठी मी उद्धव ठाकरे नाहीये; फडणवीसांचे 'त्या' चर्चांवर थेट...

Devendra Fadnavis: स्थगिती देण्यासाठी मी उद्धव ठाकरे नाहीये; फडणवीसांचे ‘त्या’ चर्चांवर थेट उत्तर

मुंबई | Mumbai
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर दिले. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील जनतेने महायुतीमधील पक्षांवर खूप मोठा विश्वास दाखवला. आज छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील ते आपल्या सर्वांचेच दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आदर असलेले हे सरकार आहे. “जनादेश जसा दणदणीत आहे, तसाच तो खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून चालण्याचा जो मार्ग दिला आहे. त्या मार्गाने चालण्याचा हा जनादेश आहे, असे मानतो” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले.

१२ गडकिल्ले हेरिटेज झाले पाहीजे यासाठी प्रयत्न सुरु
“गड किल्ल्यांचं अतिक्रमण हटवत आहोत. 12 किल्ले युनेस्कोचे वर्ल्ड हेरिटेज झाले पाहिजेत, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. आशिथ शेलार पॅरिसला जाऊन आले. त्यांनी तिथे प्रात्यक्षिक दिले” अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. “शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबाबत अतिउच्च आदर असलेले हे सरकार आहे. आम्ही कधीच छत्रपतींच्या वारसांकडे दाखले मागितले नाहीत. तुम्ही छत्रपतींचे वारस आहात याचा दाखला काय, असे मागणारे आम्ही नाही. शिवाजी महाराज होते म्हणून आम्ही आहोत असे मानणारे आम्ही आहोत” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

वीज खरेदीचा दर कमी केला
पुढे फडणवीस म्हणाले की, १ लाख ३० हजार ग्राहकांनी रूफटॉप सोलर लावली. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. वीज खरेदीचा दर आपण कमी केला. ९५ टक्के ग्राहकांना वीज दरात दिलासा मिळाला. स्मार्ट मीटर लावणाऱ्या ग्राहकांना दिवसाच्या वीजेत १० टक्के सूट देण्याचा असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयांना आणि नियुक्त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याचे म्हटले जात आहे. नुकतेच एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अजय आशर यांना मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मित्र’ संस्थेच्या उपाध्यक्षपदावरून हटवल्याचे समोर आले. त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. खालच्या स्तरावर चर्चा करुनच काही निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढे ते म्हणाले, स्थगिती देण्यासाठी मी उद्धव ठाकरे नाहीये. यापूर्वी देखील मी स्पष्ट केले की, जे जे राज्याच्या हिताचे आहे, ते ते सुरू करत असताना शिंदे साहेबांसोबत सुरूवातीला मी होतो नंतर दादाही होते. त्यामुळे घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी एकटा शिंदेंची नाही तर तिघांची आहे. ज्याठिकाणी काही गोष्टी आम्हाला आढळल्या. त्याठिकाणी चर्चा करूनच स्थगिती दिलीये. सरकार आपणही चालवलेय बऱ्याचदा खालच्या स्तरावर गडबडी होतात.

खालच्या स्तरावर चर्चा करुनच काही निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर स्थगिती दिली तरी फडणवीसांचा दणका असे म्हटले जात. एखाद्या खात्याच्या मंत्र्यांने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार स्थगिती दिली तरी फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या खात्याला स्थगिती दिली असे म्हटले जाते. अजित पवार थेट अटॅक करतात त्यामुळे त्यांच्या वाटेला कोणी जात नाही,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“त्यामुळे एक गोष्ट सांगतो की हे समन्वयाने चालणारे सरकार आहे. या सरकारमध्ये आम्ही सगळे निर्णय तिघे मिळून घेतो. मंत्रिमंडळाच्या काही बैठका होतात. त्यापैकी काही बैठकांना अजित पवार असतात तर काही बैठकांना एकनाथ शिंदे असतात. तर काही बैठकांना दोघेही असतात. यावर जो आला नाही तो नाराज असे म्हटले जाते. माध्यमांना क्वालिटीच्या बातम्या सापडत नाहीये आणि विरोधकांना क्वालिटीची टीका करता येत नाहीये, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...