मुंबई | Mumbai
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांच्या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडले. विधानसभा निवडणुकीत राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. लोकसभेपेक्षा यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे. लोकसभेपेक्षा यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे. अखेरच्या काही तासांत मतदान मतदानाची आकडेवारी वाढल्याचे दिसून आले. या वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
“महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. आजपर्यंत जेव्हा, जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे, तेव्हा-तेव्हा भाजपा आणि मित्र पक्षांना फायदा झालेला आहे. मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीवाचा आम्हाला फायदा होईल. महाराष्ट्रात आम्ही सत्तेवर येऊ अशी अपेक्षा आहे” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. महिलांचे मतदान वाढले आहे का? “महिलांची मतदानाची टक्केवारी वाढली आहे. आम्ही बूथ सर्टिफिकेट गोळा केलेत. मी २० ते २५ मतदारसंघात फोनवर बोललो आहे. त्यांचे म्हणणे आहे की, महिलांची मतदानाची टक्केवारी वाढली आहे” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची मतदानाची टक्केवारी वाढली ही शक्यता नाकारता येत नाही. २३ तारखेला निकाल लागल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू आणि चांगला निर्णय करू. मतदानाची टक्केवारी ज्या प्रकारे वाढली आहे त्यानुसार थोडासा मला प्रो इन्कम्बन्सी फॅक्टर दिसतो. लोकांना सरकारच्या बद्दल थोडी आपुलकी वाटणे हा त्याचा अर्थ होतो, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यासोबतच, आम्ही अजूनही कोणत्याही अपक्ष उमेदवाराशी संपर्क साधला नसल्याचे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्रीपदा संदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. परवा निकाल आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष बसू आणि चांगला निर्णय करु अशी माहिती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मतदानाची टक्केवारी ज्या पद्धतीने वाढली आहे, कारण लोकांना सरकारबद्दल थोडी आपुलकी वाटते असे त्याचा अर्थ असल्याचे फडणवीस म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा