Wednesday, May 22, 2024
Homeमुख्य बातम्याफडणवीस म्हणातात, अपात्र झाले तरीही शिंदेच मुख्यमंत्री...

फडणवीस म्हणातात, अपात्र झाले तरीही शिंदेच मुख्यमंत्री…

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदांच्या अपात्रता प्रकरणात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात अद्याप निर्णय आलेला नाही. शिंदे यांच्यासह आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदे अपात्र होतील असा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका दावा केला आहे त्यामुळे या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अपात्र होणार नाहीत, मात्र अपात्र झाले तरी शिंदे विधानपरिषदेचे आमदार होऊन मुख्यमंत्रीपदी कायम राहणार, असा दावा उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका मुलाखतीत बोलताना केला आहे.

“एकनाथ शिंदे अपात्र होतच नाही. ते झाले तरी देखील विधानपरिषदेवर येऊ शकतात. पण आम्ही कायद्याने सर्वकाही केले आहे. आम्हाला कोणतीही भीती नाही. उद्धव ठाकरे हे उर्वरित पक्ष वाचवण्यासाठी ते लोकांना आशा दाखवत आहेत. हे सरकार पूर्णवेळ चालणार आहे. बी प्लानची गरज नाही. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील.”, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा समाचार घेत, अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. एकनाथ शिंदेंना विधानपरिषदेवर घ्याल, पण त्यांच्या अपात्र आमदारांचे काय? असा प्रश्न संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला आहे. तसेच, शिंदे गटाचे 40 आमदार अपात्र होतील, असा दावा संजय राऊतांनी यावेळी बोलताना केला आहे. त्यासोबतच एकनाथ शिंदेंना विधानपरिषदेवर घेणार हे वक्तव्य धिक्कार करण्यासारखं असल्याचंही संजय राऊत म्हणाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या