Sunday, January 26, 2025
Homeमुख्य बातम्याMaratha Reservation : मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे ट्वीट; म्हणाले,...

Maratha Reservation : मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे ट्वीट; म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत आम्ही…

मुंबई |Mumbai

जालना जिल्ह्यातील (Jalna District) अंबड तालुक्यामधील (Ambad Taluka) अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation)गेल्या १७ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे उपोषण (Hunger Strike) सुरू होते. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले.

- Advertisement -

Maratha Reservation : “दिल्लीत मला विचारलं मनोज जरांगे कौन है”? CM शिंदेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. उत्तरादाखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीही जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्याबद्दल आभार मानले. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी आपला लढा सुरुच राहणार आहे. मात्र आपण सगळ्यांच्या आग्रहास्तव उपोषण मागे घेत आहोत, अशी घोषणा जरांगे यांनी आज उपोषणस्थळी केली. तसेच मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन त्याच जागी सुरु ठेवणार आहोत, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले.

Accident News : पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

तर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मनोज जरांगे यांची मराठा आरक्षणासाठी भूमिका स्पष्ट आहे. ते समाजासाठी लढत असून यामध्ये त्यांचा वैयक्तिक कुठलाही फायदा नाही. मराठा समाजाला अधिकार मिळाला पाहिजे, मराठ्यांचे दुसऱ्या जातीशी कोणतेच मतभेद नाहीत, त्यामुळे रद्द झालेले आरक्षण देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सरकारने याआधी मराठा समाजाला आरक्षण १६ आणि १७ टक्के दिले होते. पण सर्वोच्च न्यायालयात कायदा केला आणि ते आरक्षण रद्द झाले. जेव्हा आरक्षण रद्द झाले त्यावेळी ३७०० मुलांच्या मुलाखती झाल्या होत्या, त्यांना नोकऱ्या देण्याचे धाडसं आम्ही केले. जे फायदे ओबीसीला मिळतात ते फायदे मराठ्यांना देण्याचे काम आम्ही केले. पण रद्द झालेले आरक्षण आपल्याला मिळाले पाहिजे अशी भूमिका सरकारची सुद्धा आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्द असून कुणावरही अन्याय न करता आम्ही ते देणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे.

Maratha Reservation : “ज्याचा हेतू शुद्ध, प्रामाणिक असतो, त्याच्या….; मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केली सरकारची भूमिका

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी श्री मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच मंत्रिमंडळातील अन्य सहकार्‍यांच्या उपस्थितीत आज मागे घेतले, ही समाधानाची बाब आहे. मराठा आरक्षणाबाबतीत आम्ही प्रारंभीपासून सातत्याने प्रयत्नरत राहिलो. ते आम्ही दिले आणि हायकोर्टात टिकले सुद्धा. सुप्रीम कोर्टात ते का टिकले नाही, यावर मत व्यक्त करण्याची आज वेळ नाही. मात्र, सारथी, छत्रपती राजर्षि शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्योजकतेला प्रोत्साहन, अधिसंख्य पदांची भरती अशा अनेक उपाययोजना अंमलात आणण्यात आल्या. आजही या सर्व बाबतीत अतिशय गतीने काम सुरु आहे. भविष्यात सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी आमचे सरकार प्रयत्नांची शर्थ करेल, असे त्यांनी म्हटले आहे .

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

मोठी बातमी! तब्बल १७ दिवसांनी मनोज जरांगेंनी सोडलं उपोषण; मुख्यमंत्र्यांची यशस्वी मध्यस्थी

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या