Thursday, July 4, 2024
Homeब्रेकिंग न्यूजपोलीस भरतीबाबत फडणवीसांनी दिली महत्वाची अपडेट; म्हणाले, पोलीस भरतीची मैदानी चाचणी…

पोलीस भरतीबाबत फडणवीसांनी दिली महत्वाची अपडेट; म्हणाले, पोलीस भरतीची मैदानी चाचणी…

मुंबई | Mumbai
राज्यात १९ जूनपासून सार्वत्रिक पोलीस भरती सुरू झालेली आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात १७ हजार ४७१ पदांसाठी ही पोलीस भरती प्रकिया पार पडत आहे. या भरती प्रकियेसाठी सध्या उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील नांदेड आणि अमरावती ग्रामीण पोलीस भरती रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी या पोलीस भरतीबाबत महत्वाची माहिती दिली.

- Advertisement -

काय म्हणाले फडणवीस?
पाऊस आहे त्या ठिकाणी मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यापुढेही पावसाचे दिवस आहेत. त्यानंतर पुढे आचारसंहिता सुरु होईल. अशावेळी पोलीस भरतीची मैदानी चाचणी लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न राहील. ‘मुलांचे वय निघून जाईल. त्यानंतर त्यांना दुसरी संधीही मिळत नाही. त्यात मुले घरी चालले आहेत. त्यांच्यासाठी फारशा व्यवस्था नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी मंगल कार्यालयात व्यवस्था करायला सांगितली आहे’, असेही त्यांनी जूनमध्ये पोलीस भरती घेण्यावर भाष्य केले.

हे ही वाचा : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? निवडणुक आयोगाने दिली महत्वाची माहिती

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील गृहविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.यात इफेक्टिव्ह आणि इफिशियंट कामासाठी एका प्रकल्पाचं प्रेझेंटेशन करण्यात आलं. ज्यामध्ये एक कंपनी सरकारची तयार केली आहे. जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्हा झाल्यास तो सोडवणे या करता येणार आहे. त्याचे मॉड्युल तयार केले होते त्याच सादरीकरण आज झालेलवकरच हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

या प्रकल्पामुळे कायदा आणि सुव्यवस्था तसेच गुन्हेगारीची माहिती काढणे, सीसीटीव्ही तपासणी, नंबर प्लेट ओळखणारा कॅमेरा नसला तरी याच्या माध्यमातून ती शोधून काढू शकतो. पोलिसांना गुन्हा घडल्यानंतर तपासासाठी काही महिने लागतात, ते काही मिनिटात शोधता येईल. वाहतूक नियोजनातही याचा फायदा होईल. ज्या प्रकारचे मॉड्युल तयार करून सर्व युनिट्स इंटिग्रेड करणे सोपे होईलय. सर्वात आधुनिक सायबर केंद्र आपण तयार केले आहेय लवकरच ते कार्यनवित होईल. त्यामुळे सर्वात सशक्त पोलीस दल देशात आपले असेल, असेही ते यावेळी म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या