मुंबई । Mumbai
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर वर्षा बंगल्यात गृहप्रवेश केला आहे. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर त्यांनी कुटुंबासह विधिपूर्वक पूजा करून नव्या निवासस्थानी प्रवेश केला. या कार्यक्रमाचे फोटो त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. मात्र, एकनाथ शिंदे यांनीही उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर वर्षा बंगल्यावरच वास्तव्य सुरू ठेवले होते. त्यामुळे फडणवीस सागर बंगल्यावरच राहत होते. यावरून विरोधकांनी अनेकदा प्रश्न उपस्थित केले होते की, मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर कधी राहायला जाणार?
यावरून अनेक चर्चांना उधाण आले होते. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी दावा केला होता की, वर्षा बंगल्यात जादूटोणा झालेला आहे. रेड्याची शिंगे पुरल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यामुळेच फडणवीस तिथे राहायला तयार नाहीत, असे राऊत म्हणाले होते. या दाव्यानंतर फडणवीसांनी त्याचे खंडन करत स्पष्ट केले होते की, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.
शेवटी, ३० एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यात विधिवत पूजा करत गृहप्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन वर्षा (Varsha) बंगल्यावरील गृहप्रवेशाचे फोटो शेअर केले आहेत.
https://x.com/fadnavis_amruta/status/1917491530278805761
अमृता फडणवीस यांनी एक्सवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सर्वांना अक्षय तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा संपन्न करीत गृहप्रवेश केला. आजच्या दिवशीची आणखी एक अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सर्वांना सांगताना मन खुशीने भरून गेलंय, आमची सुकन्या दिविजा ही १०वी च्या बोर्ड परीक्षेत ९२.६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. आज (दि.30) आसीएससीने घेतलेल्या 10 बोर्डाच्या परिक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला.