Friday, February 6, 2026
Homeक्राईमदेवगाव येथे आढळला तरुणाचा मृतदेह

देवगाव येथे आढळला तरुणाचा मृतदेह

देवगाव |वार्ताहार| Devgav

नेवासा तालुक्यातील देवगाव येथील शहापूर-देवगाव रस्त्यालगत इदगाह मैदानामध्ये असलेल्या दर्ग्याजवळ तरुणाचा मृतदेह आढळून आला. दुपारच्या सुमारास लहान मुले खेळण्यासाठी दर्गाह जवळ गेली असता तिथे कोणी तरी मृत अवस्थेत असल्याचे लक्षात येताच त्यांनी शेजारी राहणारे एका कुंटुबाला माहिती दिली. त्यानंतर तेथे शेजारी राहणार्‍या पैकी दोनचार व्यक्तींनी बघतिले असता सदर मृत व्यक्ती गावातील इलेक्ट्रीक वायरमन मोटार रिवाईडिंगचे काम करणारे हे देविदास शिवाजी ठोंबरे (वय 37) असल्याची खात्री झली. त्यानंतर त्यांनी पोलीस पाटील शिवाजीराव कोलते यांना माहिती दिली.

- Advertisement -

त्यांनी घटनास्थळी येवून माहिती घेत जवळ असलेल्या कुकाणा दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे यांना कल्पना दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन मृत व्यक्ती बघितली असता अंदाज व्यक्त करताना मयत झालेल्या व्यक्तीने विषारी औषध प्राशन केल्याचे दिसून येत असल्यासारखे वाटले. सदर व्यक्तीचे मृत्यूचे कारण समोर न आल्याने त्यांची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृत शव नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मनाजी जाधव या घटनेचा तपास करीत आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...