Friday, February 6, 2026
Homeजळगावदेवकरांचा रिक्षातून प्रवास; मतदारांशी साधला संवाद

देवकरांचा रिक्षातून प्रवास; मतदारांशी साधला संवाद

जळगाव । प्रतिनिधी

महाविकास आघाडीचे जळगाव ग्रामीण मतदारसंघातील उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी रायपूर-कुसुंबा भागातील प्रचार रॅलीवेळी रिक्षातून प्रवास केला. उमेदवाराचा साधेपणा पाहुन मतदारांनी कौतूक केले.

- Advertisement -

गुलाबराव देवकर यांनी जळगाव तालुक्यातील कुसुंबा, रायपूर, मन्यारखेडा, फातेमानगर तसेच तरसोद परिसरातील मतदारांच्या भेटी घेतल्या. मतदारांशी संवाद साधताना त्यांनी महाविकास आघाडीच्या ध्येय धोरणांची तसेच जाहीरनाम्याची माहिती दिली. रायपूर येथे सुरू असलेल्या कीर्तन सप्ताहाच्या ठिकाणी भेट दिली व त्याठिकाणच्या कीर्तनकारांचे आशिर्वाद घेतले. रस्त्याची अडचण लक्षात घेता फातेमानगर भागात राहणार्‍या मतदारांच्या भेटीसाठी थेट रिक्षातून प्रवास केला. त्यांच्याशी संवाद साधताना मतदारांनी आपल्या अडचणी मांडल्या. सेवेची संधी मिळाल्यानंतर तुमच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही गुलाबराव देवकर यांनी दिली.

YouTube video player

मन्यारखेड्यात औक्षण
देवकर यांनी मन्यारखेडा गावात भेट दिल्यानंतर महिला वर्गाने त्यांचे घरोघरी औक्षण केले व त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. सगळीकडे उत्साहाचेवातावरणहोते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...