Saturday, November 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबारामती ते सप्तशृंगीगड पायी प्रवास; अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन

बारामती ते सप्तशृंगीगड पायी प्रवास; अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन

सप्तशृंगीगड | वार्ताहर Saptshrungi Gad

- Advertisement -

आदिशक्ती श्री सप्तशृंगी देवीच्या नवरात्रोत्सवाला भक्तिभावाचे वातावरण लाभले असताना, सातव्या माळेच्या दिवशी बारामतीहून पायी आलेल्या भाविकांनी अजितदादा पवार यांचे छायाचित्र देवीच्या दरबारात आणल्याने उपस्थितांचे लक्ष वेधले. अजितदादांप्रती असलेली आपुलकी आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देताना बारामती येथील संयोजक भावूक झाले. त्यांना अश्रू अनावर झाल्याचे यावेळी दिसून आले.

नवरात्रोत्सवात राज्याच्या विविध भागांतून भाविक आई सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गडावर दाखल होत असतात. याच भक्तिमय वातावरणात बारामतीहून पायी प्रवास करून आलेल्या भाविकांनी अजितदादा पवार यांचे छायाचित्र देवीच्या चरणी नेले. या प्रसंगातून भाविकांच्या मनातील श्रद्धा, भावना आणि आठवणी व्यक्त झाल्या.

देवीच्या दर्शनासाठी केलेला पायी प्रवास, त्यातून व्यक्त झालेली निष्ठा आणि अजितदादांच्या आठवणींनी भारावलेले संयोजक यामुळे हा प्रसंग उपस्थितांसाठी भावनिक ठरला. नवरात्रोत्सवाच्या उत्साही वातावरणात श्रद्धा आणि भावनांचा संगम पाहायला मिळाला.

सप्तशृंगी गडावरील हा प्रसंग नवरात्रोत्सवातील धार्मिक वातावरणात विशेष लक्षवेधी ठरला. बारामतीहून आलेल्या भाविकांच्या या कृतीमुळे अजितदादांच्या छायाचित्राची चर्चा गडावर रंगली.

ताज्या बातम्या

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा दोन दिवस पुणे दौऱ्यावर

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai केंद्रीय गृह मंत्री अमित शहा येत्या १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी दोन दिवसांच्या पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात दिवंगत उपमुख्यमंत्री...