Friday, November 15, 2024
Homeनाशिककोटमगावला भाविकांची गर्दी

कोटमगावला भाविकांची गर्दी

विठ्ठल भक्तांच्या गर्दीने फुलले रस्ते

- Advertisement -

येवला । प्रतिनिधी Yeola


वारकर्यांच्या दिंड्या व हजारो भाविक मोठ्या संख्येने कोटमगाव फुलून गेले. पांडूरंगाच्या दर्शनाने वारकरी धन्य झाले. टाळ मृदुगांच्या गजरासह विठोबा-रखुमाई, जय हरी विठ्ठलच्या गजरात आणि सुरेल अभंगांच्या साथीने येवला – वैजापूर महामार्ग विठ्ठल भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते.तालुक्यासह आसपासच्या तालुका परिसरातून अडीचशेहून अधिक दिंड्याही कोटमगावी आल्या होत्या. कोटमगावकडे जाणारे चारही बाजुचे रस्ते या दिंड्या आणि विठ्ठल भक्तांच्या गर्दीने फुलुन गेले होते.


कोटमगाव येथील विठ्ठल मंदिरात पहाटे पंचायत समिती गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर व नारायण पाटील, मंगला पाटील यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर पहाटेपासून तर दिवसभर व रात्री उशिरापर्यंत भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. शहरासह तालुक्यातून तसेच कोपरगाव, वैजापूर, निफाड, नांदगाव, मुखेड, पाटोदा, राजापूर, अंदरसूल व तालुक्यातील तब्बल अडीचशेहून अधिक दिंड्या दिवसभरात येथे आल्या.


देव द्वारकेहून पंढरपूरला जाताना त्यांचा मुक्काम कोटमगाव येथे झाला होता. अशी आख्यायिका आहे. विठ्ठलाच्या सर्व मुर्त्या दोनही हात कंबरेवर असलेल्या आहेत. मात्र कोटमगाव येथील मुर्ती डावा हात कंबरेवर तर उजवा हात खाली आहे. आषाढी एकादशीला या ठिकाणी वारकर्यांच्या दिंडीसह हजारो वारकरी विठ्ठलाच्या आगळ्या वेगळ्या रुपाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. दरम्यान, तालुक्याच्या चारही बाजुंनी कोटमगावच्या दिशेने मार्गक्रमण करणार्या दिंड्यांचे शहरात व तालुक्यात ठिकठिकाणी स्वागत करुन चहा, फराळ, पाणी वाटप करण्यात आले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या