Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik Trimbakeshwar News : तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकला भाविकांची मांदियाळी

Nashik Trimbakeshwar News : तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकला भाविकांची मांदियाळी

नाशिक | Nashik

आज तिसरा श्रावणी सोमवार (Shravani Monday) असल्याने त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwar) लाखो भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच भाविकांना (Devotees) दर्शनासाठी त्र्यंबकेश्वर मंदिर खुले करून देण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन व कुशावर्त कुंडात स्थान करून ब्रम्हगिरीच्या प्रदक्षिणेला सुरुवात केली. यावेळी ब्रम्हगिरी प्रदक्षिणेचा मार्ग भाविकांनी हर हर महादेव, बम बम भोलेच्या जयघोषाने दणाणून सोडला होता.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Trimbakeshwar News : तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये प्रशासनाचा चोख बंदोबस्त

त्र्यंबकेश्वर येथे श्रावण (Shravan) महिन्यात तिसऱ्या श्रावणी सोमवारी लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होतात. त्यामुळे त्र्यंबकेश्वरला श्रावण महिन्यात विशेष महत्व असते. या दिवशी ब्रम्हगिरीची प्रदक्षिणाही (Circulation of Brahmagiri) केली जाते. त्यामुळे श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी भाविकांचा ओघ जास्त असतो. काल (रविवार) दुपारपासूनच त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी वाढली होती. त्यामुळे त्र्यंबकला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

हे देखील वाचा : Nashik Rain News : विजांच्या कडकडाटासह त्र्यंबकेश्वरला पावसाची हजेरी; भाविकांचे हाल

दरम्यान, काल रात्री आठ वाजेपासूनच भाविकांनी कुशावर्तावर (Kushwarth) स्थान करत ब्रम्हगिरीच्या प्रदक्षिणेला सुरुवात केली होती. रविवारी रात्री भाविकांची सुरु झालेली ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा सोमवारी सकाळच्या सुमारास पूर्ण झाली. यावेळी प्रदक्षिणा मार्गावर विविध सामाजिक संस्थांच्या वतीने फराळाचे पदार्थ, केळी, चहाचे वाटप करण्यात आले.

परिवहन महामंडळाच्या वतीने २७० जादा बससेवेचे नियोजन

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने यंदा त्र्यंबकेश्वरसाठी २७० जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. यात नाशिक ते त्र्यंबकसाठी १९०, अंबोली ते त्र्यंबकसाठी एक, पहिने ते त्र्यंबकसाठी १०, घोटी ते त्र्यंबकसाठी १०, खंबाळे ते त्र्यंबकसाठी ५० अशा २७० बसच्या माध्यमातून फेऱ्या सुरू आहेत.

एक हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त

तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी त्र्यंबकेश्वर येथे जवळपास एक हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये एक अप्पर पोलीस अधीक्षक, तीन पोलीस उपाअधीक्षक, १८ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ४० पोलीस निरीक्षक, ३९० पोलीस उपनिरीक्षक, १३० पुरुष अंमलदार, १३० महिला पोलीस अंमलदार आणि ४३० होमगार्ड असा एक हजार पोलिसांचा बंदोबस्त आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...