Friday, May 3, 2024
Homeनाशिकधर्मदाय खाजगी रुग्णालयांच्या तपासणी सदस्यपदी प्रा. आ. देवयानी फरांदे यांची नियुक्ती

धर्मदाय खाजगी रुग्णालयांच्या तपासणी सदस्यपदी प्रा. आ. देवयानी फरांदे यांची नियुक्ती

नाशिक | Nashik (प्रतिनिधी) :

राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत ‘धर्मदाय खाजगी रुग्णालयांच्या तपासणी’ समितीच्या सदस्यपदी नाशिक मध्य मतदारसंघाच्या आमदार तथा भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस प्रा. देवयानी फरांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र विधिमंडळाच्या कामकाजात धर्मदाय खाजगी रुग्णालयांच्या तपासणी समितीचे काम महत्वपूर्ण असते. या समितीत वार्षिक उत्पन्न ८५००० रुपयांपेक्षा अधिक नसेल अशा निर्धन व्यक्ती आणि वार्षिक उत्पन्न १ लाख ६० हजार पेक्षा अधिक नसेल अशी समाजातील दुर्बल घटकातील व्यक्ती यांच्यासाठी उपरोक्त योजनेंतर्गत उपचार देणे धर्मदाय खाजगी रुग्णालयांना बंधनकारक असते.

यासाठी रुग्णाचे केशरी, पिवळे रेशनकार्ड व तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो. मात्र अशा प्रवर्गातील अनेक रुग्णांना बऱ्याचदा रुग्णालयात दाखल करुन घेतले जात नाही.

तसेच त्यांच्याकडून वाढीव दर आकारला जातो. या रुग्णालयांत १० टक्के खाटा या निर्धन रुग्णांसाठी, तर १० टक्के खाटा या दुर्बल घटकांतील लोकांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक असते. या सर्व कामांची देखरेख या समितीमार्फत केली जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या