Saturday, July 27, 2024
Homeनाशिकधामण नदी संवर्धन योजना राबवणार

धामण नदी संवर्धन योजना राबवणार

दिंडोरी । Dindori

दिंडोरी शहरातील श्री ईशान्येश्‍वर विद्यानिकेतनच्यावतीने धामण नदी संवर्धनासाठी पुढाकार घेण्यात आला असुन धामण नदी सवर्धन योजनेवर काम करण्यास पालक-शिक्षक संघाने ठराव केला आहे व मंजुरी दिली आहे.

- Advertisement -

अरुणोदय सामाजिक संस्थेच्या वतीने धामण नदी संवर्धन प्रकल्प राबवण्यात येत आहे. ह्या प्रकल्पांतर्गत धामण नदी प्रदुषण थांबवणे, नदी बारमाही प्रवाहीत करणे, आदी उद्दिष्ट्ये ठेवण्यात आले आहे. याअंतर्गत पुर्वी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे.

पुढील काळात नदीकिनारी दोन्ही बाजुंना प्रशासन व लोकसहभागातुन सुशोभिकरण करणे असे नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्‍वभुमिवर महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधुन श्री ईशान्येश्‍वर विदयानिकेतन व ज्युपिटर इंग्लिश मिडीअम यांची शिक्षक पालक संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत विदयार्थ्याच्या ऑनलाईन शिक्षणावर चर्चा झाली. त्याचबरोबर धामण नदी संवर्धन प्रकल्पाच्या समन्वंयक आरती देशमुख यांनी प्रकल्पाची उददीष्टये सांगितली. विदयार्थ्याकडुन जनजागृतीची कामे केली जाणार असल्याची त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांच्या सांगण्यानुसार नदी स्वच्छ केली जाणार आहे.विदयार्थ्यामध्ये राष्ट्रीय मुल्यांची जोपासणा व्हावी, विदयार्थ्याच्या हातुन राष्ट्रीय कार्य व्हावे यासाठी विदयार्थ्याचा सहभाग धामण नदी सवर्धन योजनेत रहावा असा ठराव श्री ईशान्येश्‍वर विदयानिकेत पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा गायत्री धुमणे यांनी मांडला.

त्यास ज्युपिटर इंग्लिश मिडीअम स्कुल शिक्षक पालक संघाच्या अध्यक्षा फरीदा शेख यांनी अनुमोदन दिला. उपसि्थत पालकांनी ठरावास सर्वानुमते मंजुरी दिली. विदयार्थ्यांना या प्रकल्पामुळे प्रोत्साहन मिळणार असल्याने व लॉक डाऊन काळात सर्जनशिलता जीवंत रहाणार असल्याने आम्ही सर्व पालक त्यांना घरातुन प्रोत्साहन देऊ असे मत पालकांनी व्यक्‍त केले. आरती देशमुख यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली व पुढिल प्रशासकिय पाठपुूराव्यांचे नियोजन सांगितले.

प्राचार्य जंजीर भंडींगे यांनी शाळेच्या सहभागाची माहिती दिली.विदयार्थ्याच्या नैतिक मुल्यांची जोपासणा करण्याचे काम यानिमित्ताने होणार असल्याचे भंडींगे यांनी सांगितले. याप्रसंगी स्वागत निलेश खरे यांनी केले. आभार अजित पगार यांनी मानले.कार्यक्रमास संदिप धुमणे,अर्जुन धुमणे,योगेश धुमणे,सौ.भेरे यांच्यासह पालक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या