Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDhananjay Munde: अजित पवारांसोबत धनजंय मुंडेंची तासभर बैठक; राजीनाम्याच्या चर्चेबाबत दिली पहिली...

Dhananjay Munde: अजित पवारांसोबत धनजंय मुंडेंची तासभर बैठक; राजीनाम्याच्या चर्चेबाबत दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | Mumbai
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात विरोधाकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून करण्यात येत आहे. सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ यांनी राज्यपालांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशा मागणीचे निवेदन दिलेय. आपण या प्रकरणात लक्ष घालू असे आश्वासन देखील राज्यपालांनी दिले आहे. तसेच आम्ही उद्या मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटणार आहोत अशी माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे.

या घडामोडी सुरु असतानाच धनंजय मुंडे हे मंत्री असून ते तपासावर प्रभाव टाकू शकतात, असे मत विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील आमदार व्यक्त करत आहेत. यातच धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मंत्रालयात भेट घेतली. तब्बल एक तास मुंडे आणि अजित पवारांमध्ये चर्चा चालली. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष या भेटीकडे लागले होते. या भेटीनंतर आता धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले धनंजय मुंडे?
धनंजय मुंडे म्हणाले, “अजितदादांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी मी आलो होतो. माझ्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाचा आढावा अजितदादांना दिला आहे.” तुम्ही राजीनामा देणार का, दादांशी कोणत्या विषयावर चर्चा झाली असे विचारण्यात आल्यावर ते म्हणाले की, कोणत्याही विषयावर चर्चा झालेली नाही. तर संतोष देशमुख प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यामुळे मी त्यावर बोलणे योग्य नाही, असे ते म्हणाले. ऑन SIT मधून अधिकारी काढले, तोच फॉर्म्युला तुम्हाला लागू ? हे तुम्हाला योग्य वाटते का? हे सगळे मिडिया ट्रायल सुरू आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, या संदर्भात त्यांना विचारले असता या प्रकरणावर कोणतीही चर्चा झाली नाही. कोणी काय आरोप करावेत हा ज्याचा त्याचा विषय आहे. लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिला आहे, मी काय प्रत्येकाचे तोंड धरू शकत नाही. ज्या पक्षातील नेत्यांकडून आरोप होत आहेत, त्या पक्षाच्या अध्यक्षांना हा प्रश्न विचारा. पोलीस यंत्रणा काम करत आहे. माझ्याकडे जेव्हा संशयाने पाहिले जाते, तेव्हा या संदर्भात मी अधिक बोलणे योग्य नाही. ज्या तपास यंत्रणांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांचा तपास पूर्ण होऊ द्या, ट्रायल कोर्टात होऊन द्या, तपास यंत्रणा काम करत आहेत, असे मुंडे यांनी म्हटले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...