Saturday, September 14, 2024
Homeमुख्य बातम्याNCP Crisis : शरद पवारांची साथ का सोडली? धनंजय मुंडेंनी स्पष्टच सांगितलं

NCP Crisis : शरद पवारांची साथ का सोडली? धनंजय मुंडेंनी स्पष्टच सांगितलं

मुंबई |Mumbai

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सहभागी होत मंत्रीपदाची शपथ घेतली. या राजकीय घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही गटात विभागला गेला आहे. अशातच आता अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवारांची साथ का सोडली? यावर भाष्य केले आहे…

दोन लक्झरी बसेसचा भीषण अपघात; पाच ठार, 25 जण गंभीर

यावेळी बोलतांना मंत्री मुंडे म्हणाले की, शरद पवार (Sharad Pawar) साहेब आमचे दैवत आहेत, आमचे आधार आहेत, पवार साहेबांना सोडण्याच्या आणि न सोडायचा या प्रक्रियेमध्ये मी सामान्य कार्यकर्ता होता. तसेच ज्या माणसाला कधीच कोणाला ओळखता आले नाही, त्या माणसाला मी ओळखण हा तुमचा गैरसमज आहे, असे मुंडे यांनी म्हटले. तर भाजपसोबत जाणे ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणून घेतलेली भूमिका आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणून आम्ही जेव्हा ही भूमिका घेतो, या संदर्भात ५ तारखेच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) मेळाव्यात अजित दादांनी आपली भूमिका स्पष्टपणे सांगितली आहे. साल निहाय सांगितली, तारीख निहाय सांगितली. त्यामुळे मी आणखी बोलणे उचित नाही, असेही धनंजय मुंडेंनी यावेळी सांगितले.

पुढे बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, ईडी, सीबीआयच्या दबावाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपसोबत गेल्याचा आरोप आमच्यावर करण्यात येत आहे. मात्र, ईडी, सीबीआय,इन्कम टॅक्सच्या नोटीस या आज नाही बऱ्याच वर्षापासून चालल्या आहेत. त्यामुळे या चार गोष्टीमुळे जवळ गेलो नसल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले. तसेच हा निर्णय घेण्यावेळी सर्व नेते त्या ठिकाणी होते, आणि त्यांनी हा निर्णय घेतला होता, त्यामुळे माझ्या सारखा दुसऱा तिसरा फळीतला कार्यकर्ता, काही वेगळा विचार करत नव्हता, आम्ही सर्वांनीच तिकडे सांगितले, असेही मुंडे यांनी म्हटले.

महाराष्ट्रात पावसाची उघडीप? नाशिक, नगरला अद्यापही प्रतीक्षाच

मंत्री धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची विचारधारा सोडली नाही. आमचं दैवत पवार साहेबचं आहेत,आमचे आधारस्तंभ पवार साहेबच आहेत, पण पक्ष म्हणून घेतलेली भूमिका हा महायुतीचा भाग होता, सर्व आमदारांची (MLA) कामे होणे, मतदारसंघात विकास होणे, आमदार म्हणून उत्तरदायित्व आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले. याशिवाय आमचा देव देवाऱ्यात आहे आणि मनात आहे, आता देवाऱ्यात जाऊन देवाने पुजा करू नये असे जरी म्हटले तरी भक्त त्याला मनात ठेऊन त्याला पुजतोच, असेही मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या