Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDhananjay Munde: धनंजय मुंडे यांना Bell's Palsy नावाचा आजार; सलग दोन मिनिटे...

Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांना Bell’s Palsy नावाचा आजार; सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!

मुंबई | Mumbai
राज्याचे कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे गेल्या काही २ महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात असून बीडमधील सरपंच हत्याप्रकरणातील आरोपींशी जवळीक असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. एकीकडे धनंजय मुंडेंवर आरोपांचा मालिका सुरू असतानाच त्यांच्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती घेत आहेत. पण या नंतर आता धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाचा दुर्मिळ आजार झाला आहे. यामुळे त्यांच्यावर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु आहे. या आजारामुळे त्यांना सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलता येत नसल्याबाबत त्यांनी स्वत:च सोशल मीडियावर पोस्ट करुन सांगितले.

काय म्हणाले धनंजय मुंडे?
माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ.टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्याच दरम्यान मला Bell’s palsy नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे, सध्या एक-दोन कॅबिनेट बैठका आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही, अशी माहिती मंत्री मुंडे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टममधून दिली. तसेच, याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कल्पना दिलेली आहे. लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजु होईल, असेही धनंजय मुंडेंनी आपल्या पोस्टमधून म्हटले आहे.

- Advertisement -

काय आहे Bell’s Palsy आजार?
“Bell’s Palsy” हा एक मेंदूशी संबंधित म्हणजेच न्यूरोलॉजिकल समस्या आहे, ज्यामध्ये चेहऱ्याची नस (फेशियल नर्व) कमजोर होते किंवा प्रभावित होते, त्यामुळे चेहऱ्याच्या एका बाजूला तात्पुरता लकवा सदृश्य स्थिती निर्माण होते. या आजारात चेहऱ्याच्या एका बाजूला कमजोरी किंवा लकवा मारल्यासारखे जाणवते. तसेच, डोळे आणि तोंड बंद करण्यास त्रास जाणवतो. बोलताना आणि खाताना अडचण येते, चेहऱ्यावर मुंग्या आणि सुन्न झाल्यासारखे वाटते. कानाजवळ वेदना किंवा संवेदनशीलता वाढते, अशी लक्षणे जाणवतात.

बेल्स पाल्सीची कारणे:
व्हायरस संसर्ग (जसे की हर्पीस व्हायरस)
अचानक थंडी लागणे किंवा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे
जास्त तणाव किंवा मानसिक दडपण
मधुमेह (डायबिटीज) किंवा इतर काही आरोग्य समस्या

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...