Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रPankaja Munde : 'भाऊ माझा पाठीराखा'; अडचणीत सापडलेल्या पंकजांना धनंजय मुंडे देणार...

Pankaja Munde : ‘भाऊ माझा पाठीराखा’; अडचणीत सापडलेल्या पंकजांना धनंजय मुंडे देणार मदतीचा हात

मुंबई | Mumbai

भाजप नेत्या (BJP leader) पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला (Vaidyanath Cooperative Sugar Factory) जीएसटी विभागाकडून (GST Department) १९ कोटींचा जीएसटी कर चुकवल्याप्रकरणी जप्तीची नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे अडचणीत सापडल्या असून आता त्यांच्या मदतीला भाजपसोबत सत्तेत असलेले त्यांचे भाऊ आणि मंत्री धनंजय मुंडे हे धावून जाणार आहेत….

- Advertisement -

MLA Disqualification : आमदार अपात्रता प्रकरणाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले…

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पंकजा मुंडे यांचा कारखाना वाचवण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) मार्गदर्शन करणार आहेत. धनंजय मुंडे हे कारखान्याकडून सरकारला प्रस्ताव पाठवण्याबाबत पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करणार आहेत. प्रशासकीय स्तरावर कारखान्यासाठी काय केले पाहिजे, याबाबत धनंजय मुंडे कारखान्याचे पदाधिकारी आणि पंकजा मुंडे यांना आज किवा उद्या मार्गदर्शन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे हे गेल्या काही काळापासून वैद्यनाथ साखर कारखान्याशी जोडले गेले आहेत. त्यांच्यासुद्धा भावना या कारखान्याशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे हा कारखाना वाचवण्यासाठी प्रयत्न करणे, याला त्यांच्या व्यावसायिक दृष्टीकोनापेक्षा भावनिक कारण जास्त आहे.

Shivsena Crisis : शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या खासदारांना नोटीस; नेमकं प्रकरण काय?

गेल्या काही वर्षांपासून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात राजकीय वैर आहे. २०१४ मध्ये पंकजा मुंडेंनी विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांचा परळीमधून पराभव केला होता. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला होता. तेव्हापासून दोघे एकमेकांचे विरोधक आहेत. मात्र, दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतील एका गटाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडत भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यात धनंजय मुंडे यांनी देखील अजित पवारांच्या गटात (Ajit Pawar Group) सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली होती. तसेच यावर्षी रक्षाबंधनानिमित्त धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंसह त्यांच्या बहिणींकडून राखी बांधून घेतल्याचे पाहायला मिळाले होते.

Asian Games 2023 : भारताची पदकांची लयलुट सुरूच; सिफ्ट सामराची नेमबाजीत सुवर्णपदकाला गवसणी

दरम्यान, केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने ६ महिन्यांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर छापेमारी (Raid) करून काही कागदपत्रे तपासले होते. या तपासामध्ये कारखान्याने १९ कोटी रुपयांचा जीएसटी बुडवल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर रविवार (दि.२४ सप्टेंबर) रोजी छत्रपती संभाजीनगर येथील जीएसटी आयुक्तालयाने (GST Commissionerate) या कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. तसेच पंकजा मुंडे यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया देतांना म्हटले होते की, मला अडचणींच्या काळात केंद्र सरकारकडून मदत मिळाली नाही. इतर सर्व साखर कारखान्यांना मदत मिळाली. केवळ माझ्या कारखान्याला मदत मिळाली नाही, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik News : नाशकात विजांच्या कडकडाटासह पाऊस; गंगापूर धरणातून ‘इतक्या’ क्युसेसने विसर्ग

- Advertisment -

ताज्या बातम्या