Friday, May 16, 2025
Homeनाशिकधनंजय निकम मालेगावचे नवे अपर जिल्हाधिकारी

धनंजय निकम मालेगावचे नवे अपर जिल्हाधिकारी

नाशिक | प्रतिनिधी 

- Advertisement -

मालेगाव शहरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोनामुळे येथील परिस्थिती बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत मालेगावमध्ये सक्षम अधिकाऱ्याची गरज होती. त्यामुळे नंदुरबार येथे कार्यरत असलेल्या धनंजय निकम यांची मालेगाव येथे अपर जिल्हाधिकारीपदी बदली झाली झाली आहे. काल (दि. १६) रोजी नंदुरबार येथील कार्यालयास आदेश प्राप्त झाले आहेत.

अपर जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार धनंजय निकम उद्या (दि. १८) रोजी स्वीकारण्याची शक्यता आहे. करोनाचा मालेगावमध्ये अक्षरश: कहर केलेला बघायला मिळतो आहे. रुग्णसंख्या पन्नाशीनजीक पोहोचली आहे. मालेगावमध्ये अनेक लहान सहान गल्लीबोळ आहेत. इथे झोपडपट्टीदेखील मोठी आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्याच्या याठिकाणी सक्षम अधिकारयाची गरज होती.

थोड्याच दिवसांपूर्वी कळवणचे प्रांत डॉ. पंकज आशिया यांना घटना व्यवस्थापक तथा इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे प्रमुख समन्वयक म्हणून  जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी नवी जबाबदारी दिली आहे.

दरम्यान, मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी पदावर असलेले लक्ष्मण राऊत यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिल्यामुळे मालेगावची धुरा नव्या अधिकाऱ्याच्या अंगी सोपविल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वादळी पावसात पत्र्याचे शेड कोसळले; एक जण जखमी

0
  येवला| प्रतिनिधी Yeola शहर व परिसरात आजही, गुरुवारी (दि. १५) दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्याने शहरातील गंगा दरवाजा भागात पत्र्याचे शेड...