Wednesday, September 11, 2024
Homeनगरबंडगर, रूपनवर यांना काही झाल्यास गाठ धनगरांशी

बंडगर, रूपनवर यांना काही झाल्यास गाठ धनगरांशी

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

गेल्या 19 दिवसांपासून चौंडी येथे उपोषणाला बसलेले सुरेश बंडगर व अण्णासाहेब रूपनवर यांच्या पोटात अन्नाचा कण नाही. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. या दोघांच्या जीवास काही बरेवाईट झाल्यास सरकारची गाठ धनगरांशी आहे हे विसरू नये अशा संतप्त भावना उपोषणकर्त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केल्या.

- Advertisement -

चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या किर्ती स्तंभाशेजारी यशवंत सेनेच्यावतीने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, यासाठी गेल्या 19 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. मुंबई येथील बैठक निष्फळ ठरल्याने अण्णासाहेब रूपनवर यांनी उपचार नाकारत पुणे येथून चौंडी गाठली आहे. यामुळे आता धनगर बांधव अधिक आक्रमक झाले आहेत. रविवारी (दि. 24) चौंडी येथे उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांच्या कुटुंबियांनी त्यांची भेट घेतली. यावेळी कुटुंबाला आपल्या भावना अनावर झाल्या होत्या. सरकारला उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला वेळ नाही. धनगर समाजाचा एवढा अपमान करू नका. लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा परिणामांना सामोरे जा असा इशारा उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांची कन्या प्रतिक्षा बंडगर यांनी सरकारला दिला.

घोषणांनी दणाणली चौंडी

आज चौंडी येथे भूम आणि गेवराई येथील 125 मोटारसायकल, परभणी, पालम येथून 100 चारचाकी गाड्या रॅलीने दाखल झाल्या. यावेळी हजारो धनगर युवकांनी आपला रोष व्यक्त करत, घोषणा देत चौंडी परिसर दणाणून सोडला.

- Advertisment -

ताज्या बातम्या