Monday, June 24, 2024
Homeमुख्य बातम्याDhangar Reservation : धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मंत्री विखे पाटलांच्या अंगावर उधळला भंडारा

Dhangar Reservation : धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मंत्री विखे पाटलांच्या अंगावर उधळला भंडारा

सोलापूर | Solapur

- Advertisement -

राज्यात मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलं आहे. रोजच कुठे ना कुठे मराठा आंदोलकांचं आंदोलन सुरू आहे. काही ठिकाणी निदर्शने केली जात आहे. तर काही ठिकाणी मोर्चे काढले जात आहे. जाळपोळ सुरू आहे. तर काही ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू आहे.

मराठा आंदोलक पेटलेले असतानाच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये म्हणून ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे. आता धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला असून या आंदोलकांनी थेट सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळून जाहीर निषेध नोंदवला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूर येथील शासकिय विश्रामगृहात थांबले होते, यावेळी धनगर आरक्षण कृती समितीचे कार्यकर्ते त्यांना निवेदन देण्यासाठी म्हणून आले. या कर्यकर्तांनी विखे निवेदन स्वीकारत असताना त्यांच्या अंगावर भंडारा टाकला. एका मराठी वृत्तवाहिनीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

काही महिन्यांपूर्वीच मंत्रीमंडळातील चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर पिंपरी-चिंचवडमध्ये शाई फेकण्यात आली होती. या घटनेच्या काही वेळातच पोलिसांनी शाई फेकणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले होती.

दरम्यान दुसरीकडे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास कुणबी समाजानं विरोध केला आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यास आम्ही आंदोलन करू, महाराष्ट्र बंद ठेवू असा इशारा सकल कुणबी समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे. आज याबाबत कुणबी समाजाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पुढील रणनिती ठरवली जाण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या