Sunday, October 6, 2024
Homeनगरधनगर समाजाच्या दोघा कार्यकर्त्यांनी जलसमाधी घेतल्याचा संशय

धनगर समाजाच्या दोघा कार्यकर्त्यांनी जलसमाधी घेतल्याचा संशय

प्रवरासंगम येथे नदीत दिवसभर शोधमोहीम

देवगडफाटा |वार्ताहर| Devgad Phata

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण (Dhangar Samaj Reservation) मिळावे या मागणीसाठी धनगर समाजाच्या दोघा आंदोलकांनी गुरुवार दि.26 रोजी सकाळी प्रवरासंगम (Pravra Sangam) येथील गोदावरी नदीमध्ये (Godavari River) जलसमाधी घेतल्याचा संशय असून त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासनाने दिवसभर या दोघांचा शोध घेतला.

- Advertisement -

‘आम्ही जलसमाधी घेत आहोत, तुम्हाला शेवटचा जय मल्हार” अशी चिट्ठी व इर्टिगा चारचाकी गाडी नदी पुलावर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मागील 9 दिवसापासून नेवासा फाटा (Newasa Phata) येथे आंदोलन सुरु आहे. धनगर समाजाचे 6 जण उपोषणासाठी बसले होते.

त्यामधील बाळासाहेब कोळसे रा. आडगाव ता. पाथर्डी व प्रल्हाद चोरमारे रा. छत्रपती संभाजीनगर हे दोघे प्रातःर्विधीला जावून येतो असे सांगून उपोषणस्थळावरून निघून गेले व धनगर समाजाच्या एका कार्यकर्त्याला (श्री. नजन) फोन केला की, ‘आम्ही जलसमाधी घेत आहोत, तुम्हाला शेवटचा जय मल्हार’ असे सांगून फोन बंद केला. कार्यकर्त्यांनी प्रशासनाला ही माहिती कळवताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे फौज फाट्यासह प्रवरासंगम येथील पुलावर पोहचले. त्यांच्या पाठोपाठ तहसीलदार संजय बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, धनगर समाजाचे नेते अशोक कोळेकर हेही घटनास्थळी पोहचले.

कोळसे व सोरमारे यांचा पाण्यामध्ये शोध घेण्याचे स्थानिक लोकांनी कार्य सूरु केले पण जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरचे पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने शोध कार्यासाठी मर्यादा आल्या. शासकीय यंत्रणा मुंबईपासून दिल्लीपर्यंत हालली केंद्रीय अपात कालीन मदत पथक (एनडीआरएफ) ची तूकडी बोलविन्यात आली आहे. नदी पात्रात शोध घेण्याचे कार्य सुरु असून एनडीआरएफची (NDRF) तुकडी बोलावण्यात आल्याची माहिती प्रांत अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली. सायंकाळी सात वाजे पर्यत हे पथक पोहचले नव्हते. दरम्यान संतप्त आंदोलकांनी (Movement) गोदावरी पुलावरच ठाण मांडून नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्ग अडवला.

शोध पथकाला सापडला तिसराच
वरील दोघांचा पुलाखाली नदीमध्ये शोध सुरू असतानाच गंगापूर तालुक्यातील वैभव करपे (वय अंदाजे 31) या युवकाने गोदावरीच्या जुन्या पुलावरून कौटुंबिक कारणाने नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बचाव पथक व स्थानिक मच्छिमारांनी तत्काळ त्याला पाण्यातून बाहेर काढून खाजगी दवाखान्यात दाखल केल्याने तो वाचला.

- Advertisment -

ताज्या बातम्या