Sunday, April 27, 2025
Homeक्रीडाबुद्धिबळ स्पर्धेत नाशिकची धनश्री राठी विजेती

बुद्धिबळ स्पर्धेत नाशिकची धनश्री राठी विजेती

नाशिक | Nashik

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश महेश्वरी युवा संगठन मुंबई यांच्या तर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत धनश्री अनिल राठी हिने अतिशय सुंदर खेळाचे प्रदर्शन करून प्रथम क्रमांक मिळविला.

- Advertisement -

दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत धनश्री राठी हिने प्रथम क्रमांक मिळवत नऊ हजारचे बक्षीस जिंकले. काल या स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर झाला.

स्पर्धेत भारतासह विविध देशातील एक हजार पेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले होते. महेश्वरी समाजातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धा घेण्यात आल्या.

धनश्रीला प्रशिक्षक अमित तारे तसेच कॅन्डीडेट मास्टर व फिडे प्रमाणित प्रशिक्षक श्री विनोद भागवत यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे. सध्या ती मोरफी चेस अकॅडमीत बुद्धिबळाचा सराव करत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...