Saturday, May 25, 2024
Homeमुख्य बातम्यारामभूमीवर धनुष्यबाण विजयी हॅट्ट्रिक साधणार

रामभूमीवर धनुष्यबाण विजयी हॅट्ट्रिक साधणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मुख्यमंत्र्यांनी जनसामान्यांच्या प्रश्नासाठी मोठे काम केले आहे. तळागाळातील जनतेसाठी केलेल्या कामांची माहिती खेडोपाड्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम शिवसैनिकांना करावयाचे आहे. रामाच्या पदस्पर्शाने पावन भूमीवर तिसर्‍यांदा रामाचे धनुष्यबाण विजयी करुन हॅट्ट्रिक साधण्यासांठी सर्वांनी ताकदीने कामाला लागण्याचे आवाहन खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.

- Advertisement -

शिवसेनेच्या वतीने नाशिकला आयोजित करण्यात आलेल्या युवासेनेच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात उपस्थितांशी संवाद साधताना खा. शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपिठावर पालकमंत्री दादा भुसे, शिवसेनेच्या प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे, खा. हेमंत गोडसे, शिवसेनेचे सचिव भाऊलाल चौधरी, आ. सुहास कांदे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, भाऊलाल तांबडे, चंद्रकांत लवटे, दिंडोरी संपर्कप्रमुख सुनिल पाटील, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र सोनवणे, प्रवीण तिदमे, योगेश म्हस्के, सविता कोतवाल, धनराज महाले, संजय दुसाने, गणेश कदम, भिवानंद काळे, सनी रोकडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खा. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांनी केवळ बाळासाहेबांचे विचार समोर ठेवूनच काम केले आहेत. जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते 18 ते 20 तास काम करताना दिसून येत आहेत. त्यांच्या माध्यमातून केलेल्या कामांना जनतेसमोर ठेवण्याची वेळ आगामी लोकसभा व विधानसभेच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे. त्यासाठीं प्रत्येकाने सक्रिय सहभाग घेण्याची गरज असल्याचे सांगितले. नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळावी, यासाठी आपणही प्रयत्नशिल राहणार असल्याचे खा. शिंदे यांनी सांगितले.

तत्पूर्वी खा. गोडसे यांनी दहा वर्षात केलेल्या कामांचा आढावा सांदर करताना खा. शिंदे यांना प्रभू रामचंद्रांच्या पुण्यभूमीत नाशिकला पुन्हा एकदा धनुष्यबाण विजयी करण्यासाठी जागा शिवसेनेलाच घेण्यासाठीं शिफारस करण्याचे आवाहन केले.

यावेळी बोलताना शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी नाशिक हे शिवसेनेचे नाक असल्याचे सांगून नाशिकला तिसर्‍यांना हॅट्ट्रिक करुन भगवा फडकवत दिल्लीला पाठवण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी हिर्‍यापोटी गारगोटी आल्याचे सांगून उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली. यावेळी जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी शिवसेनेची शाखा म्हणजे सेवा, सुरक्षा व संस्कृतीचे केंद्र आहे. नाशिकच्या कार्यालयातून शासनाच्या विविध योजनांची अमलबजावणी करुन घेण्यातून मोठी सेवा दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शिवसेनेच्या वैद्यकीय सेवा देणार्‍या मंगेश दिवटे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देताना केलेल्या कामाचा आढावा सादर केला. मुख्यमंत्र्यांनी नुकतेच प्रत्येक कागदपत्रांवर आईच्या नावाचा उल्लेख करण्याचा शासकीय निर्णय घेऊन माय माऊलीचा सन्मान केला असल्याचे सांगितले.

यावेळी युवा व्यसनमुक्ती उपक्रमाला गती देण्यासाठीं तयार करण्यात आलेल्या युवा विश्वभारती वेब साईटचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर सुवर्णा मटाले, मंगला भास्कर, श्रध्दा जोशी, पूजा धुमाळ, रोशनी कुंभार्डे, अस्मिता देशमाने, अ‍ॅड. शामला दीक्षित, आविष्कार भुसे, अभिषेक चौधरी, योगेश बेलदार, रुपेश पालकर, आंबादास जाधव, दीपक मौले आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्यने होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या