Sunday, November 24, 2024
Homeधुळेधर्मवीर आनंद दिघे उद्यानाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

धर्मवीर आनंद दिघे उद्यानाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

धुळे । प्रतिनिधी dhule

शासन आपल्या दारी या जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी दि.10 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे धुळे महानगरीत येत आहेत. या शासकीय दौर्‍यात मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी आ.मंजुळा गावित यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. आणि या प्रसंगी शीतल कॉलनीतील शीतलेश्वर महादेव मंदिरालगत धर्मवीर आनंद दिघे उद्यानाचे लोकार्पण मुख्यमंत्री करणार असल्याची माहिती आ. मंजुळा गावित यांनी दिली आहे.

- Advertisement -

आ.गावित यांच्या निवासस्थानासमोर असलेल्या खुल्या (ओपनस्पेस) जागेवर सुमारे दहा हजार चौरस मीटरच्या परिसरात एक ओबडधोबड टेकडी होती. त्या टेकडीवर कॉलनीवासियांनी काही वर्षांपूर्वी शीतलेश्वर महादेव मंदिराची उभारणी केली होती. या सर्व मोकळ्या जागेस महापौर असतांना मंजुळा गावित यांनी दगडी संरक्षण भिंत बांधून वृक्षारोपण केले होते. हा टेकडीचा परिसर सुशोभिकरण करुन येथे उद्यान विकसित करावे अशी शीतल कॉलनीतील जेष्ठ नागरीकांनी आमदारांकडे मागणी केली होती.

त्यांच्या मागणीची दखल घेऊन महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, अभियंता कैलास शिंदे, श्री.ओगले, शासकीय ठेकेदार ओ.बी. वाघ, विजय वाघ यांच्यासमवेत बैठक घेवून टेकडीचा परिसर उपयोगात घेऊन उद्यान विकसित करण्याचे नकाशे व अंदाजपत्रक तयार करुन घेतले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुलभूत सोयी सुविधा योजने अंतर्गत निधी मंजुर करुन उद्यानाची उभारणी केली.

या टेकडीवर असलेल्या जुन्या महादेव मंदिर परिसराचे नुतनीकरण करुन भाविकांना दर्शनासाठी जाणे-येणे सोयीचे व्हावे म्हणून मार्बलच्या पायर्‍या, वयोवृध्दांसाठी रेलींग, मंदिर परिसरातील फरशी नविन लावली, पाणी आणि विजेची सोय इत्यादी सुविधा उपलब्ध केल्या असून सपाटीकरण झालेल्या भागात जॉगींग ट्रॅक, विद्युत दिवे, खेळणी, ओपन जिम, लॉन, बैठकीसाठी सिमेंट ब्लॉक, प्राचिन वडाच्या झाडास ओटा इत्यादी सुविधा केल्या आहेत.

शहरात हे एक सुंदर उद्यानाची निर्मिती केली आहे आणि या उद्यानास धर्मवीर आनंद दिघे नाव देऊन लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आ. मंजुळा गावित यांनी दिली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या