Saturday, May 4, 2024
Homeजळगावधरणगाव : एस.टी.चा अपघात; मोठी हानी टळली

धरणगाव : एस.टी.चा अपघात; मोठी हानी टळली

धरणगाव –

अमळनेर एस.टी. आगारची एस.टी.क्रमांक एम.एच.१४ बी.टी.१३३० हि बस जळगावहून अमळनेरकडे जात असताना धरणगाव जवळ असलेल्या एस.के.जिनिंग जवळ आज दि.१८ रोजी सकाळी ११.५५ वा. अपघात झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

अमळनेर डेपोची एस.टी. जळगावहून अमळनेरकडे जात असताना धरणगाव जवळील एस.के.जिनींग जवळ समोरून भरधाव येणाऱ्या कारला वाचवताना ही एस.टी.रस्त्याच्या कडेला उतरली. कारचा वेग जास्त असल्याने ही कार जिनींगमध्ये घुसली व एस.टी.रस्त्याच्या खाली उतरली. कार चालक मात्र पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मोठी हानी टळली

एस.टी.ज्याठिकाणी उतरली त्याठिकाणी इलेक्ट्रीक डीपी होती. चालकाच्या प्रसंगावधानाने एस.टी.ची. व एस.टी.तील प्रवाशांचा जिव वाचला. सदर एस.टी. प्रवाशी व पासधारक विद्यार्थ्यांनी फुल भरलेली होती.

चालकाची समयसुचकता

अमळनेर डेपोचे या एस.टी.चे चालक व्ही.बी.सैंदाने यांनी समयसुचकता दाखविल्याने अपघातात होणारी मोठी जिवीतहानी टळली असल्याचे बोलले जात आहे. त्यांचेसोबत वाहक डी.जे.भोई हे होते. अपघातातील काही जखमींना धरणगाव रूग्णालयात उपचार सुरू असून धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या