Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजKirti Pujar: धाराशिवच्या शेतकऱ्यावर आभाळ कोसळलेलं असतानाच जिल्हाधिकारी मात्र नाचण्यात दंग; किर्ती...

Kirti Pujar: धाराशिवच्या शेतकऱ्यावर आभाळ कोसळलेलं असतानाच जिल्हाधिकारी मात्र नाचण्यात दंग; किर्ती पुजारांवर टीकेची झोड

धाराशिव | Dharashiv
मराठवाड्यामध्ये आठवडाभरापूर्वी पावसाने थैमान घातले. याचा सर्वाधिक फटका धाराशिव जिल्ह्याला बसला. धाराशिवमधील हजारो हेक्टरी शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. धाराशिवची झालेली परिस्थिती पाहता या जिल्ह्यातील आमदार-खासदार सुद्धा पुराच्या पाण्यात उतरून लोकांना मदत करताना पाहायला मिळाले. मात्र दुसरीकडे त्याच धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे बेजबाबदार वर्तन समोर आले आहे. धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार मात्र नाच गाण्यात व्यग्र असल्याचे दिसून आल्याने संताप व्यक्त होत आहे.

धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना जिल्हाधिकारी डान्स करत असल्याने नेटकऱ्यांकडून जिल्हाधिकारी जोरदार ट्रोल झाले. २४ सप्टेंबर रोजीचा हा व्हिडीओ असून जिल्हाधिकारी तुळजापुरातील एका कार्यक्रमात नाचताना दिसत आहे. त्यांच्यासोबत निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव या सुध्दा नाचताना दिसत आहे. जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांच्या असंवेदनशीलपणाचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून लोकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

बुधवारी २४ सप्टेंबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी लातूर आणि सोलापूर येथील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनीही भूम, वाशी आणि इतर पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. नुकसानीचा अंदाज घेतला. अजूनही या जिल्ह्यावर पावसाची अवकृपा असल्याचे दिसून येत आहे. अजुनही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

YouTube video player

पण त्याच दिवशी सायंकाळी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी तुळजापूर येथे आयोजित केलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये आपल्या पत्नीसह आणि धाराशिवच्या निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी कलावंतासह डान्स केला. एकिकडे शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेला असताना जिल्हाधिकारी यांनी आपली त्यांच्या प्रति असलेली असंवेदना दाखवून दिली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. काहींनी मात्र जिल्हाधिकाऱ्यांची बाजू उचलून धरली. लोककलावंताना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी हा प्रकार केल्याचा काहींचा दावा आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik News : कट चहा ५, कॉफी १२ तर मिसळपाव ‘इतक्या’...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक महापालिका सार्वत्रिक निवडणूक (Nashik Municipal Corporation) २०२६ च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने स्थानिक प्रचलित दरांची यादी...