मुंबई | Mumbai
राजकीय घराण्यात भाऊबंदकी रंगली असतानाच आता बाप-लेकीत सामना रंगण्याची चिन्ह आहेत. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि त्यांची कन्या भाग्यश्री हे आगामी विधानसभा निवडणुकीत आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
कारण भाग्यश्री आत्राम हलगीकर या शरद पवार गटात प्रवेश करण्याची तारीख नक्की झाली आहे. येत्या १२ सप्टेंबरला भाग्यश्री आत्राम या शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
हे हि वाचा : ते आमच्या ग्रृपचे कॅप्टन…; अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मंत्री छगन भुजबळांचे सूचक विधान
शरद पवारांची शिवस्वराज्य यात्रा १२ सप्टेंबरला अहेरीत येणार आहे. यावेळी भाग्यश्री शरद पवार गटात प्रवेश करतील. हा बाबा आत्राम यांना मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा होती. तसेच अजित पवार यांच्य न्याय सन्मान यात्रेतही भाग्यश्री आत्राम यांचा उल्लेख झाला होता. अजित पवार यांनी कोणाचेही घर फोडू नये, असे जाहीर आवाहन केले होते.
हे हि वाचा : “बारामतीला मी सोडून दुसरा आमदार मिळायला हवा, मग…
यानंतर बाबा आत्राम यांनी मुलीशी आणि जावयाची आपला संबंध नसल्याचे सांगितले. तिला फेकून द्या, असेही आवाहन केले होते. वडील आणि अजित पवारांच्या समजावण्यावरूनही भाग्यश्री आत्राम हलगेकर यांनी आपला निर्णय कायम ठेवला आहे.