Monday, June 24, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षाणाबाबत बागेश्वर बाबांचे मोठे वक्तव्य; म्हणाले...

मराठा आरक्षाणाबाबत बागेश्वर बाबांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…

मुंबई | Mumbai

- Advertisement -

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील आमरण उपोषणास बसले होते. पण, सरकारच्या विनंतीनंतर जरांगे-पाटलांनी दोन महिन्यांची मुदत देत उपोषण मागे घेतले आहे. आता मराठा आरक्षणावर बागेश्वर धामचे अध्यात्मिक गुरू धीरेंद्र कृष्ण शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांनी भाष्य केले आहे.

बागेश्वर बाबांना याच विषयासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला थेट पाठींबा दिला. इतकेच नाही तर त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मराठ्यांचा सर्वात मोठा वाटा असल्याचेही म्हटले. “मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मन की बात करणे वेगळी गोष्ट आहे आणि अधिकाराबद्दल बोलणे वेगळी गोष्ट आहे. मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे असे बागेश्वर बाबा म्हणाले.

OBC Leaders Meeting : छगन भुजबळांनी बोलावली सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची बैठक; काय निर्णय घेणार?

पुढे ते असे ही म्हणाले, भारत गुलामगिरीमध्ये होता तेव्हा आपल्या शौर्याने आणि विरतेने भारताला गुलामगिरीमधून मुक्त करण्याचे उपकार मराठ्यांनी केलेत. भारताला स्वातंत्र्य करण्याचे सर्वाधिक श्रेय हे मराठ्यांनाच जाते. त्यामुळे मराठा सामजाला आरक्षण मिळाले पाहिजे,” असे बागेश्वर बाबा म्हणाले.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अयोध्यानगरी येथे ६ ते ८ नोव्हेंबरदरम्यान कार्यक्रम पार पडणार आहे. संभाजीनगरमधील क्रांती चौकामधून भव्य कलश यात्रा काढण्यात आली. या कलशयात्रेसाठी हजारोंच्या संख्येनं भाविकांनी क्रांतीचौकामध्ये गर्दी केलेली. अयोध्यानगरीमधील मैदानावर श्रीराम कथेला सुरुवात केली.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या