Thursday, June 13, 2024
Homeनाशिकआज ठक्कर डोममध्ये रंगणार ढोलताशा महोत्सव

आज ठक्कर डोममध्ये रंगणार ढोलताशा महोत्सव

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

आपल्या मांगल्याचे प्रतिक असणारे हे ढोलताशा वादन ऐकणाऱ्या प्रत्येकाला ठेका धरायला अन् पाय थिरकायला लावले नाही तर नवलच. हेच महत्व अधोरेखित करण्यासाठी व नाशिकचा डंका जगभर गाजविणाऱ्या ‘नाशिक ढोल’चा (Nashik Dhol) सन्मान करण्यासाठी शिवसेना नाशिक महानगर आणि ऊर्जा युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त माध्यमातून शिवसेना “नाशिक ढोलताश महोत्सव २०२३ – जल्लोष तरूणाईचा” चे आयोजन शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी केले आहे…

शनिवार दिनांक ९ सप्टेंबर दुपारी ४ वाजता ठक्कर डोम येथे शिवसेना नाशिक महानगराच्या वतीने आयोजित केलेल्या या नाशिक ढोलताश महोत्सव साठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे, गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महोत्सव होणार आहे.

G Marimuthu : प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, डबिंग स्टुडिओमध्ये घेतला अखेरचा श्वास

मराठी व हिंदी चित्रपट अभिनेते सेलिब्रिटी श्रेयस तळपदे, अभिनेता व शिव चित्रपट सेना अध्यक्ष शुशांत शेलार, अभिनेत्री सई ताम्हणकर यांची देखील कार्यक्रमास उपस्थिती राहणार आहेत. तसेच शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी कॉंगेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.  

नाशिकमध्ये धो-धो; गंगापूरमधून विसर्ग वाढवला, ‘या’ धरणांमधूनही सोडले पाणी

नाशिक शहर व जिल्ह्यातील एकूण १४ ढोलतशा पथकांचे या महोत्सवात सादरीकरण होणार आहे. लयबद्ध ताल आणि ठेका या वैशिष्ट्यांवर आधारीत असलेला हा ढोलताशा संगीत विश्वाची संस्कृती अधिक समृद्ध करेल. शंख, झांज, टाळ आणि भला मोठा ढोल असा साजशृंगार असलेल्या नाशिक ढोलची जादुई नजाकत यावेळी काही औरच असणार आहे.  

जागतिक बँकेकडून पंतप्रधानांचे कौतुक; म्हणाले ५० वर्षांचं काम…

विविध उत्सवांमध्ये ढोल-ताशांच्या गजरावर ठेका धरण्याबरोबरच तो वाजवण्याचीही अनेकांना इच्छा असते, मात्र त्यातील शास्त्रशुद्ध प्रशिक्षण नसल्याने या इच्छेवर मर्यादा येतात. ढोल बांधण्यापासून तो कसा पकडावा, वाजवावा, ढोलची काळजी कशी घ्यावी हे देखील या महोत्सवात नाशिकरांना अनुभवायला मिळणार असल्याने नाशिकरांसाठी मोठी पर्वणीच ठरणार असल्याचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Asia Cup 2023 : भारत- पाकिस्तान सामन्यात पाऊस आला तरी ‘नो टेन्शन’! आयोजकांनी घेतला मोठा निर्णय

- Advertisment -

ताज्या बातम्या