Friday, March 28, 2025
Homeक्रीडाधोनीने आणखी १० वर्ष खेळावे

धोनीने आणखी १० वर्ष खेळावे

नवी दिल्ली –

ऑॅस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकल हसीने महेंद्र सिंग धोनीबद्दल एक खास इच्छा व्यक्त केली आहे. धोनीने पुढील १० वर्ष क्रिकेट खेळावे असे मायकल हसीने म्हटले आहे. चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू असलेल्या मायकल हसीने धोनी आणि कोच स्टिङ्गन फ्लेमिंग यांच्या घट्ट संबंधांचे देखील कौतुक केले.

- Advertisement -

धोनी आणि फ्लेमिंग यांच्याबद्दल हसी म्हणाला की, दोघेही एकमेंकाचा सन्मान करतात. एकमेकांना कॉम्पलिमेंट देतात. दोघांमध्ये एक चांगले नाते आहे. दोघांनाही खेळाची समज आहे. दोघेही स्मार्ट असून, सोबत चांगले काम करतात.

मिस्टर क्रिकेट नावाने प्रसिद्ध असलेला हसी धोनीविषयी म्हणाला की, धोनी नेहमीच आपल्या खेळाडूंचे समर्थन करतो. सोबतच टीमच्या भल्ल्यासाठी अनेकदा अचानक हैराण करणारे निर्णय घेतो. कर्णधार म्हणून धोनी मला खूप आवडतो. तो आपल्या खेळाडूंना पाठिंबा देतो व त्यांच्यावर विश्वास ठेवतो. अनेकदा असे निर्णय घेतो की तुम्हाला समजत नाही, मात्र नंतर तुम्हाला हैराणी होते की कसे हे टीमच्या बाजूने होते.

हसी म्हणाला की, धोनीने आणखी एक दशकभर खेळावे. मात्र नंतर व्यावहारिक होत हसी म्हणाला की, माझी इच्छा आहे की धोनी शक्य आहे तोपर्यंत खेळावे. मला आशा आहे की त्याने पुढील १० वर्ष खेळावे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहारांची चौकशी होणार

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती कल्पना चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माजी सभापतींच्या कार्यकाळातील कामकाजाच्या व्यवहारात अनियमितता असल्याचे प्रथमदर्शनी आढळून...