धुळे – Dhule – प्रतिनिधी :
जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण 127 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तर देवपूरातील विटभट्टी परिसरातील एका 52 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा काल रात्री तर बोराडी (ता. शिरपूर) येथील 71 वर्षीय वृध्दाचा आज सायंकाळी मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. दरम्यान जिल्हाची एकुण रूग्ण संख्या 2 हजार 419 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत एकूण 93 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
दुपारी चार वाजता खाजगी लॅबमधील 48 अहवालांपैकी 20 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात खालचे गाव, शिरपूर 1, राम मंदिर समोर, मुकटी (ता. धुळे) 5, वाडीभोकर (ता. धुळे) 1, पारोळा रोड, धुळे 1, सुभाष नगर, बाळापूर 1, दोंदे कॉलनी देवपूर 2, नेर (ता. धुळे) 1, चितोड, धुळे 1, मनमाड जीन धुळे 1, सुपडू आप्पा कॉलनी 1, देवभाने (ता. धुळे) 1, अर्थे (ता.शिरपूर) 1, विद्यानगरी धुळे 1, छडवेल (ता.साक्री) 1 व सावळदे (ता. शिरपूर) येथील एका रूग्णाचा समावेश आहे.
रात्री सात वाजता शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील 66 अहवालांपैकी 13 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात व्यंकटेश नगर 1, दहिवद 3, वाडी 2, जैन मंदिर 1, बोराडी 1, होळनांथे 2, भोई गल्ली 1, लाकड्या हनुमान 1, कुरखळीतील एका रूग्णाचा समावेश आहे.
भाडणे ता. साक्री येथील सीसीसी केंद्रातील 37 अहवालांपैकी 8 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात स्वामी सोसायटी साक्री 1, मेन रोड कासारे 1, शिवाजी चौक विटाई 1, ग्रामपंचायत 1, सुशिलानगर साक्री 1, जैताने 2 व सटाणा रोड परिसरातील एक रूग्ण आहे.
तसेच जिल्हा रुग्णालय येथील 77 अहवालांपैकी 32 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात स्वामी नारायण कॉलनी 1, गल्ली न.4- 1, नेताजी कॉलनी 1, फॉरेस्ट कॉलनी 1, सदाशिव नगर 1, अभियंता नगर 1, राजीव गांधी नगर 3, यशवंत नगर 1, अंबिका नगर मार्केट यार्ड 1, नागाई कॉलनी 1, कोळवले नगर 1, फागणे 1, मुकटी 1, आर्वी 3, नरव्हाळ 3, सोनगीर 6, खेडा 1, कापडणे 2, नकाणे 1, पाडळदे ता.धुळे येथील एक रूग्ण आहे.
दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय येथील 56 अहवालांपैकी 12 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात पिंपदे दोंडाईचा 1, मालूनगर दोंडाईचा 1, दोंडाईचा 3, वालखेडा (ता. शिंदखेडा) 1, सोनगड शिंदखेडा 1, स्वामी समर्थ नगर, शिंदखेडा 1, सर्वोदय कॉलनी दोंडाईचा 1, रावल नगर दोंडाईचा 1, हुडको कॉलनी दोंडाईचा 1, आप्पासाहेब नगर दोंडाईचातील एका रूग्णाचा समावेश आहे.
तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 54 अहवालांपैकी 17 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात श्रीरंग कॉलनी दत्तमंदीर 2, श्री हरी समर्थ नगर 3, सुभाष नगर 1, रामचंद्र नगर 1, मोगलाई 1, कुमार नगर 1, गणेश कॉलनी साक्री रोड 1, अजबे नगर 1, बाभुळवाडी, धुळे 1 , देवपूर 1 व धुळ्यातील इतर 4 जणांचा समावेश आहे. जिल्ह्याची एकूण रूग्ण संख्या 2 हजार 419 वर पोहोचली आहे.