Sunday, April 27, 2025
Homeधुळेधुळे : दिवसभरात आढळले ३७ रुग्ण ; जिल्ह्यात बाधितांची संख्या २०७१

धुळे : दिवसभरात आढळले ३७ रुग्ण ; जिल्ह्यात बाधितांची संख्या २०७१

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

धुळे महापालिका, एचडीएफसी बँक आणि एसआरपीएफमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. आज दिवसभरात 37 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. तर जिल्ह्यात बाधितांची संख्या 2071 झाली आहे.

- Advertisement -

धुळे महापालिकेतील 57 वर्षीय कर्मचारी कोरोना बाधित आढळून आला असून याबाबत महापालिका पॉलिटेक्नीक सीसीसी येथून अहवाल प्राप्त झाला आहे. तर शहरातील विद्यानगर येथील एक, एसआरपीएफचा 47 वर्षीय जवान आणि अन्य एक हे देखील बाधित आढळले आहेत. तसेच शिरपूर येथील एकाचा कोरोना पॉझीटीव्ह अहवाल आला आहे.

सायंकाळी 7 वाजता शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथून प्राप्त झालेल्या अहवालानुसार आठ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात बोराडी दोन, तरडी दोन, कुवे एक, लकड्या हनुमान एक, सुकवद एक, राजपूत वाडा एक या रुग्णांचा समावेश आहे.

बँकेत कोरोनाचा शिरकाव- शहरातील ग.नं.6 मध्ये असलेल्या एचडीएफसी बँकेतील पाच कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले आहेत. याबाबत आज जिल्हा रुग्णालयातून अहवाल प्राप्त झाला आहे. यापुर्वी देखील एक कर्मचारी बाधित आढळून आला होता. त्यावेळी तीन दिवस बँक बंद ठेवण्यात आली होती.

धुळे तालुक्यातील तिखी येथेही एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे. तर रात्री शिरपूर उपजिल्हा रूग्णालय येथील दहा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात जवखेडा चार, विखरण दोन, वाडी, कुवे, अजंदे आणि एसबीआय शनिमंदिर प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. दोंडाईचा उपजिल्हा रूग्णालय येथील दोन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यात दोंडाईचा येथील सरस्वती कॉलनीतील रूग्णांचा समावेश आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील सात अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शिंदखेडा, बोरोडी, भोईगल्ली सुभाष नगर, जय जवान चौक, देवपूर येथील प्रत्येकी एका रूग्णांचा समावेश आहे. व अन्य दोन रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 2071 वर पोहचली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

IPL 2025 : आज डबल हेडर; ‘हे’ संघ भिडणार, उपांत्य फेरी...

0
मुंबई | Mumbai इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (रविवारी) दोन सामने खेळविण्यात येणार आहेत. यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ...