Tuesday, November 26, 2024
Homeधुळेप्लॉस्टीक कचरा आणि कपड्यांच्या गठ्ठया आड गुटख्याची वाहतूक

प्लॉस्टीक कचरा आणि कपड्यांच्या गठ्ठया आड गुटख्याची वाहतूक

धुळे | प्रतिनिधी dhule

सुरत (surat) येथून मालेगाव (Malegaon) येथे विक्रीसाठी जाणार्‍या राज्यात प्रतिबंधीत गुटखा, पानमसाल्याची वाहतूक स्थानिक गुन्हे शाखेच्या (lcb) पथकाने साक्रीत रोखली. ट्रकसह १२ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालकाही ताब्यात घेतले.

- Advertisement -

प्लॉस्टीक कचरा आणि कपड्यांच्या गठ्ठया आड गुटख्याची वाहतूक केली जात होती. याप्रकरणी साक्री पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सुरत येथुन निघालेल्या ट्रकमधून (क्र.एमएच ४१ जी ७१६५) राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा विक्री करण्यासाठी साक्री-धुळे मार्गे मालेगाव येथे नेला जात असल्याची खात्रीशीर माहिती काल दि. २६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यांनी तत्काळ पथकाला ट्रकचा शोध घेवून कारवाईचे आदेश केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रकचा शोध सुरू केला. संशयीत ट्रक हा दहीवेलकडुन साक्रीकडे जात असल्याचे दिसल्याने पथकाने ट्रक थांबविला. त्यावरील चालकाने त्याचे नाव शेख अस्लम शेख उस्मान (वय ४३ रा.न्यु आझादनगर, गल्ली नं. ५ मालेगाव) असे सांगितले. ट्रकमधील मालाबाबत विचारपुस केली असता त्याने उडवा-उडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे त्याला ट्रकसह साक्री पोलीस ठाण्याच्या आवारात आणले.

ट्रकची तपासणी केली असता त्यात ९८ हजार ४०० रूपयांचा विमल सुंगधीत पानमसाला व तंबाखुचा साठा मिळून आला. त्यासह १० लाखांचा ट्रक, ५ हजारांचा मोबाईल व १ लाख १५ हजारांचा प्लास्टीक कचरा व कपड्याचे गठ्ठे असा एकुण १२ लाख १८ हजार ४०० रूपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. एकुण ९८ हजार ४०० रुपयांचा गुटखा मालेगाव शहरात विक्री करण्याच्या उद्येशाने चालक शेख अस्लम शेख उस्मान हा सुफीयान (रा.मालेगाव) याने ट्रकमध्ये लोड केलेला गुटखा वाहतुक करतांना मिळुन आला. त्यामुळे चालकासह दोघांविरुध्द साक्री पोलीस ठाण्यात पोकॉ महेंद्र सपकाळ यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पोसई बाळासाहेब सुर्यवंशी, असई संजय पाटील, पोहवा संतोष हिरे, सतीष पवार, पोना पंकज खैरमोडे, पोकॉ महेंद्र सपकाळ यांच्या पथकाने केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या