धुळे – Dhule – प्रतिनिधी :
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्कालीन पाटबंधारे खात्याचे मंत्री गिरीष महाजन या जोडगोळीने जलयुक्त शिवार आणि अटल आरोग्य शिबिरे घेवून महाराष्ट्राची तिजोरी लुटली. यात….
भ्रष्ट्राचार झाल्याचा थेट आरोप श्री. गोटे यांनी केला आहे. आपल्याच टोळीला हाताशी घेवून व प्रसार माध्यमातील निवडक साथी सोबत घेवून त्यांनी याबाबत वारेमाप प्रसिध्दी करुन घेतली.
वास्तविक श्री. महाजन यांचा वैद्यकीय शिक्षणाशी सोडा पण शिक्षणाशी देखील दुरान्वयाने संबंध होता किंवा काय? याची शंकाच आहे. असे असतांना यांच्याकडे फडणवीस यांनी वैद्यकीय शिक्षण सोपविले. याचा वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना किती लाभ झाला हा संशोधनाचाच विषय आहे.
अटल आरोग्य शिबिरांबाबत स्वत:च कौतुक करुन घेतले तरी वैद्यकीय अधिकारी शासनाचे, यंत्रणा शासनाची, राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना वेठीस धरुन शिबिरे घेतली. वास्तविक याबाबत निधी आला कुठून? औषधांचा साठा किती आला? किती वापरला गेला? शिल्लक औषध साठ्यांचे काय झाले? आरोग्य शिबिरांसाठी निधी कमी पडला तर त्याची पुर्तता कुणी अथवा कुठल्या विभागाकडून करण्यात आली? अशी माहिती आपण स्वत: मागितली असतांनाही दहा महिन्यात ती आपल्याला मिळालेली नाही, असे श्री. गोटे यांनी म्हटले आहे.