धुळे – Dhule – प्रतिनिधी :
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घालून महाराष्ट्राचा सूड घेतला असल्याचा आरोप करीत या प्रश्नी
- Advertisement -
उद्या 18 सप्टेंबर रोजी धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्याचे आंदोलन केले जाईल, असे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी कळविले आहे.
श्री. गोटे यांच्या नेतृत्वाखाली उद्या सकाळी 9 वाजता बाजार समितीच्या आवारात आंदोलन होईल. यावेळी जिल्हाभरातील शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी शेतकरी आघाडीचे प्रशांत भदाणे, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, किरण पाटील, जि.प. विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे, शहराध्यक्ष रणजीत राजे भोसले यांनी केले आहे.