धुळे । प्रतिनिधी dhule
शहरातील अजळकर नगरातील महावितरणाचे इंजिनिअरकडे चोरट्यांनी घरफोडी केली. सुमारे एक लाखांच्या रोकडसह लहान बाळाची सोन्याची बाळी असा दीड लाखांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंजि.तुषार रमेश वराडे हे दोन दिवसांपुर्वी नातेवाईकांकडे मालेगाव येथे गेले होते. तेथून ते काल ते वणी येथील सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी गेले होते. त्यामुळ घर बंद असल्याची संधी साधत चोरट्याने घरफोडी करीत घरातील एक लाखाच्या रोकडसह लहान बाळाची सोन्याची बाळी असा एकूण दीड लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. आज सकाळी अकरा वाजेदरम्यान इंजि. तुषार वराडे हे घरी आले असता त्यांना घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. घरात प्रवेश केला असता कपाटातील कपडे अस्ताव्यस्त विखुरलेले दिसले. त्यामुळे घरफोडी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोकॉ.सचिन साळुंखे, हवालदार विजय शिरसाठ, दिनेश परदेशी यांनी पाहणी घटनास्थळी भेट देत पाही केली. तर ठसे तज्ज्ञांनी पुरावे गोळा केले. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.